कधी आहे जानकी जयंती? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
हिंदू धर्मात माता सीतेला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला माता सीता पृथ्वीवर अवतरली होती. त्यामुळेच हा दिवस जानकी जयंती म्हणून साजरा केला जातो. सीता माता ही राजा जनक यांची कन्या होती यामुळे त्यांना जानकी असेही म्हटले जाते.

जानकी जयंती, ज्याला सीता अष्टमी असेही म्हणतात, ही देवी सीतेची जयंती म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात सीता मातेला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी माता सीतेची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. या दिवशी लोक दिवसभर उपवासही करतात. तसेच माता सीता आणि श्रीराम यांची पूजा करतात. या दिवशी माता सीतेची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. या व्रताचे विशेषत: विवाहित महिलांसाठी खूप महत्त्व आहे. कारण असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो. 2025 मध्ये जानकी जयंती कधी आहे ते जाणून घेऊ.
कधी आहे जानकी जयंती?
2025 मध्ये जानकी जयंती 21 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी गुरुवारी २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:५८ वाजता सुरू होईल आणि शुक्रवारी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:५७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 21 फेब्रुवारीला जानकी जयंती साजरी केली जाईल.
पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून या व्रताची सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही जानकी जयंतीची पूजा देवघरात किंवा मंदिरात करू शकता. पूजेच्या ठिकाणी माता सीता आणि प्रभू राम यांच्या मूर्ती स्थापित करा. नंतर चौरंगावर लाल कापड टाका. पूजेमध्ये कुंकू, अक्षदा, फुले, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. जानकी जयंतीची व्रत कथा वाचा आणि नंतर माता सीतेच्या मंत्रांचा जप करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा.




जानकी जयंतीचे महत्त्व
माता सीतेला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे जानकी जयंतीला तिची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी माता सीतेची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.विशेषत: महिलांसाठी या दिवसाला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी पूजा केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते असे मानले जाते. हा दिवस माता सीतेच्या त्याग, समर्पण, धैर्य आणि भक्ती या गुणांचे स्मरण करण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा दिवस मानला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)