AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 की 6 मे अंगारकी चतुर्थीचा उपवास कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

हिंदू धर्मात भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दर महिन्याला येणारी ही चतुर्थी विशेषतः फलदायी असते. चला जाणून घेऊयात की मे महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीचा उपवास केव्हा पाळला जाईल.

5 की 6 मे अंगारकी चतुर्थीचा उपवास कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
5 की 6 मे अंगारकी चतुर्थीचा उपवास कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धतImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: May 04, 2026 | 7:45 PM
Share

हिंदू धर्मात गणपतीला पूजनीय देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. त‍र ही तिथील खूप विशेष असेल कारण यावेळी मंगळवारी ही संकष्टी चतुर्थी येत असल्याने ही अंगारकी चतुर्थी दुर्मिळ योगासोबत येत आहे. चला तर मग या चतुर्थीच्या उपवासाची नेमकी तारीख, चंद्रोदयाची वेळ आणि या दिवसाचे विशेष महत्त्व आजच्या लेखात जाणून घेऊयात.

अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे?

पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 5 मे 2026 रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी संपेल. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदयतिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास मंगळवार 5 मे 2026 रोजी केला जाईल.

अंगारकी संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची पद्धत

  • अंगारकी संकष्टी चतुर्थीला ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
  • त्यानंतर हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा संकल्प करा.
  • देव्हाऱ्यातील गणपतीचा फोटो किंवा मुर्तीला गंगाजलाने अभिषेक करून तांदळाचे दाणे, फुल, गंध,धुप तसेच दिवा व दुर्वा अर्पण करा.
  • पुजा करून झाल्यावर गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.
  • पूजा झाल्यानंतर ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा आणि संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी. रात्री चंद्राचे दर्शन करून उपवास सोडावा.

अंगारकी चतुर्थीचा महान योगायोग

या वर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी मंगळवारी आहे. शास्त्रानुसार जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थी दिवसांपेक्षा कित्येक पटीने जास्त असतात. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा मंगळाचा जास्त प्रभाव आहे त्यांनी या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होण्यास आणि कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते. या दिवशी शिवयोग देखील निर्माण होतो, जो आध्यात्मिक साधना आणि ध्यानासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती