AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse | सावधान ! गर्भवती महिलांनो सूर्य ग्रहणाच्या काळात ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

आकाशात होणाऱ्या घटनांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ज्योतिषशास्त्रातील (jyotishshashtra) सर्वत महत्त्वाची घटना म्हणजे सूर्यग्रहण. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.

Solar Eclipse | सावधान ! गर्भवती महिलांनो सूर्य ग्रहणाच्या काळात ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका
solar eplics 2022
| Updated on: Mar 22, 2022 | 2:04 PM
Share

मुंबई :  आकाशात होणाऱ्या घटनांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ज्योतिषशास्त्रातील (jyotishshashtra) सर्वत महत्त्वाची घटना म्हणजे सूर्यग्रहण. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हिंदू (Hindu)धर्मात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. पुरांनुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे.चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र व सूर्य यांची युती किंवा अमावस्या असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात 2022 मध्ये सूर्यग्रहण कधी होणार आहे . त्याच प्रमाणे या काळात गर्भवती महिल्यांनी कोणत्या गोष्टी करु नये.

2022 चे पहिले सूर्यग्रहण

2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल, शनिवारी होणार असून. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. मात्र, भारतातील हे पहिले सूर्यग्रहण अर्धवट असेल. हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये पाहता येणार आहे.

ग्रहणात काय करु नये –

  1. सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळात काहीही खाऊ नये. मान्यता आहे की याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
  2. सूर्यग्रहणावेळी सूर्याला थेट डोळ्यांनी पाहू नये. हे आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकते.
  3. या काळात गर्भवती महिलांनी जास्त हालचाली करु नये. जास्त वेळ जप करण्यात व्यतीत करावा असे पुराणात सांगण्यात येते.
  4. गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण काळात अन्न खाऊ नये कारण ते निषिद्ध मानले जाते. मात्र, मुलाचे आरोग्य लक्षात घेऊन ती फळे खाऊ शकते.
  5. या काळात महिलांनी कात्री, चाकू, पिन इत्यादी धारदार वस्तू वापरणे टाळावे, कारण यामुळे जन्मजात दोष होऊ शकतात. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याकडे न पाहण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हानिकारक किरण असतात ज्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
  6. दरम्यान, अंतिम सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, चिली, नामिबिया आणि जगाच्या इतर भागांमध्ये ते दिसेल.
  7. सूर्यग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाच वेगळे टप्पे असतात. वैश्विक घटनेचा पहिला टप्पा म्हणजे आंशिक ग्रहणाची सुरुवात, दुसरा टप्पा संपूर्ण ग्रहण असतो.
  8. ग्रहणाच्या वेळी वातावरण दुषित होते. त्यामुळे एक प्रकारची नकारत्मता पसरते. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन केलेच पाहिजे जेणेकरून तुमच्या जन्मलेल्या बाळावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

संबंधीत बातम्या :

Venus Transit | धन, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीचा कारक, शुक्र शनीच्या राशीत भ्रमण करणार , या 3 राशींच्या व्यक्तींना होणार फायदा

रंगपंचमी निमित्त तुळजाभवानी आईचा गाभारा सजला, द्राक्षांची नयनरम्य आरास

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीवर रंगांची उधळण, मंदिर रंगात न्हाऊन निघाले

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.