वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला 7 वेळा धागा का गुडांळतात, जाणून घ्या त्यामागील खास कारण
दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला सावित्री व्रत पाळले जाते. या व्रताचे अनेक नियम आहेत आणि अनेक राज्यांमध्ये या व्रताशी संबंधित वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. तर या दिवशी वडाच्या झाडाला 7 वेळा धागा का गुडांळा जातो ते आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात.

आपल्या हिंदू धर्मात व्रत आणि सणांना महत्त्व आहे, तर यंदाची वटपौर्णिमा ही २६ मे रोजी आहे. या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पुजा केली जाते व सात जन्म तोच नवरा मिळवा यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात. वट पौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. सावित्री आणि सत्यवानाची कथा या व्रताशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की वट पौर्णिमेचे हे व्रत केल्याने पतीवर येणारे सर्व संकट टळते आणि वैवाहिक जीवन आनंदी आणि समृद्ध राहते.
दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला वटपौर्णिमा हे व्रत पाळले जाते. या व्रताचे अनेक नियम आहेत आणि अनेक राज्यांमध्ये या व्रताशी संबंधित परंपरा पाळल्या जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला धागा गुंडाळतात. पण तुम्हाल यांचे कारण माहित आहे का? चला तर मग आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात…
म्हणूनच वडाच्या झाडाला धागा गुंडाळला जातो
वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी अनेक नियमांमध्ये, वडाच्या झाडाला धागा गुंडाळण्यांची परंपरा विशेष आहे. वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी, विधीनुसार वडाच्या झाडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. तसेच या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्यासोबतच त्याला सात वेळा प्रदक्षिणा घालणे आवश्यक आहे. याशिवाय, उपवास करणाऱ्या महिला वडाच्या झाडाभोवती सात वेळा धागा गुंडाळतात. असे मानले जाते की वडाच्या झाडाभोवती सात वेळा धागा गुंडाळल्याने पती-पत्नीमधील नाते सात जन्मांपर्यंत अबाधित राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडावर धागा बांधल्याने अकाली मृत्यूचा धोकाही टळतो, असेही म्हटले जाते.
वट पौर्णिमेची कथा काय सांगते?
वटपौर्णिमेची कथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पौराणिक कथेनुसार यमराजाने सावित्री मातेचे पती सत्यवान यांना वडाच्या झाडाखाली पुर्नजीवन मिळवून दिले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद दिला होता. तेव्हापासून वटपौर्णिमेचे व्रत आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणतात. वटपौर्णिमा व्रताशी संबंधित ही श्रद्धा असेही सांगते की वटवृक्षाची पूजा केल्याने भगवान यमराजांसह त्रिदेवांचे आशीर्वाद मिळतात. कारण वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळांमध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)