Maha Shivratri 2025: महाकुंभातून जाताना नागा साधू का सैल करतात धर्म ध्वजाची दोर? शेवटच्या दिवशी करतात असे भोजन
maha kumbh akharas departure: महाशिवरात्रीनिमित्त काशीमध्ये नागा साधूंची मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर होळी खेळली जाईल आणि गंगेत स्नान केले जाईल. हे तीन काम झाल्यावर नागा साधू परत जाणार आहेत.

Maha Kumbh Naga Sadhu: संगम नगरी प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु आहे. महाकुंभातील अमृत स्नान संपल्यानंतर हळहळू सर्व आखाड्यांचे नागा साधू महाकुंभातून परत जावू लागले आहे. आता फक्त सात आखाड्याचे नागा साधू महाकुंभात आहेत. ते सुद्धा 12 फेब्रुवारी पूर्वी काशीतून परत जाणार आहे. परंतु नागा साधू महाकुंभातून जाण्यापूर्वी दोन काम करतात. नागा साधू जाताना कढी-पकौडीचे जेवण करतात. तसेच दुसरे काम जाताना शिबिरात धर्म ध्वजची दोर दोर सैल करतात. त्यांची ही परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे.
अनेक वर्षांपासून ही परंपरा
नागा साधू हे दोन परंपरा अनेक वर्षांपासून राबत आहेत. त्या परंपरेनुसार नागा साधू महाकुंभातून बाहेर पडताना कढी-पकोडीचे जेवण करतात. त्यानंतर त्यांच्या शिबिरातील धार्मिक ध्वजाची दोरही सैल करतात. या परंपरेसंदर्भात जुना आखाड्याच्या संतांनी सांगितले की, ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे.
शुक्रवार महाकुंभाचा 27 वा दिवस आहे. म्हणजेच आणखी 19 दिवस महाकुंभ असणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाकुंभाचा शेवटचा दिवस असणार आहे. या महाकुंभात नागा साधूंचे तिन्ही अमृतस्नानही पूर्ण झाले आहेत. त्यानंतर नागा साधू परत जावू लागले आहेत. गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी अनेक आखाड्यातील नागा साधू परतले. तसेच काही आखाड्यातील नागा साधू 12 फेब्रुवारी रोजी परत जाणार आहे. काही आखाड्यातील नागा साधू वसंत पंचमीनंतर परत जाणार आहे. सात आखाड्यातील नागा साधू सरळ धर्म नगरी काशी विश्वानाथ येथे जाणार आहे.




तीन काम झाल्यावर परतणार नागा साधू
महाशिवरात्री येत असल्यामुळे 7 आखाड्यातील नाग काशी विश्वनाथला जाणार आहेत. ते 26 तारखेपर्यंत म्हणजेच महाशिवरात्रीपर्यंत काशीमध्ये थांबणार आहेत. यानंतर ते आपापल्या आखाड्यात परततील. महाशिवरात्रीनिमित्त काशीमध्ये नागा साधूंची मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर होळी खेळली जाईल आणि गंगेत स्नान केले जाईल. हे तीन काम झाल्यावर नागा साधू परत जाणार आहेत.
सर्व नागा साधू आखाड्यात जाणार
ऋषी-मुनींसाठी अमृतस्नान अत्यंत महत्त्वाचे आहे. अमृत स्नान केल्याने हजार अश्वमेध यज्ञ करण्याएवढे पुण्य प्राप्त मिळत असल्याचे समजले जाते. महाकुंभात अमृत स्नान केल्यानंतर ऋषी-मुनी ध्यानात लीन होतात. अमृताने शेवटचे स्नान करून सर्व नाग आपापल्या आखाड्याकडे जाऊ लागतात.