तिरुपती बालाजीला गेल्यावर केसांचं दान का करतात? काय आहे यामगची अख्यायिका?
तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील असे एकमेव मंदिर आहे जिथे लोक केस दान करण्यासाठी जातात. त्यामागे एक पौराणिक कथा आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

भारतामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत यातील काही मंदिरे त्यांच्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तर काही मंदिरे त्यांच्या अनोख्या परंपरेमुळे जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहे त्यापैकीच एक आहे तिरुपती बालाजी मंदिर जिथे देशभरातूनच नव्हे तर परदेशातून देखील अनेक लोक दर्शनासाठी येत असतात. म्हणूनच तिरुपती बालाजी मंदिराची गणना देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केले जाते कारण दरवर्षी भक्त त्यांच्या भक्तीनुसार कोट्यावधी रुपये, पैसा आणि सोन्याचा प्रसाद येथे अर्पण करतात. याव्यतिरिक्त येथे केस दान देखील करतात. असे मानले जाते की या मंदिरात केस दान केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि केस दान केल्यामुळे लक्ष्मी देवी ही प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. जाणून घेऊया काय आहे या मागची पौराणिक कथा?
कोणत्या देवाची केली जाते पूजा?
तिरुपती बालाजी हे प्रसिद्ध मंदिर श्री व्यंकटेश्वर स्वामी म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या मंदिरात श्री वेंकटेश्वर त्यांची पत्नी पद्मावती सह राहतात. हे मंदिर भारतीय स्थापत्य आणि कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरूमला पर्वतावर आहे.
काय आहे कथा?
पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता. ज्याचा वर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची. गाईच्या मालकाला हा प्रकार कळतात त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली. यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले. त्यानंतर भगवान तिरुपती बालाजी ची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती. त्यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आई म्हणाले म्हणाले की केसांमुळे शरीराचा सौंदर्य वाढतं पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला. आज पासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात. या मंदिराजवळ निलाद्री टेकड्या आहेत तिथे नीला देवीचे मंदिर आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
