महिला आणि पुरुष एकमेकांबद्दल ‘या’ गोष्टी खरंच लपवतात? हजारो वर्षांपूर्वी समोर आलेलं कारण
कळत असून सुद्धा महिला आणि पुरुष एकमेकांबद्दल का गुपित ठेवतात 'या' गोष्टी... तुम्हाला आहे का माहिती? हजारो वर्षांपूर्वी समोर आलेलं कारण...

पूर्वी पेक्षा आजचा काळ फार बदलेला आहे. पूर्वी स्त्रीयांना शिक्षण आणि नोकरी करण्याचा अधिकार नव्हता… आता मात्र परिस्थिती फार वेगळी आहे… आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत… पण तुम्ही कायम पाहिलं असेल की, शिकणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या महिला कायम स्वतःचं वय लपवतात. महिलांच्या वयाचा अंदाज त्यांच्या चेहऱ्यावरुन येतो. तर पुरुष कायम त्यांची सॅलरी लपवतात… स्त्री आणि पुरुष असं का करतात? याचं कारण हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणाक्य यांनी सांगितलं आहे.
आचार्य चाणाक्य यांनी हे केवळ आधुनिक समाजाच्या मानसिकतेला कारणीभूत ठरवलं नाही, तर त्याचं कारण प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या वर्तनात आणि मानसिक धोरणांमध्ये आहे. चाणक्य नीति आपल्याला हे वर्तन समजून घेण्याची गुरुकिल्ली देते.
महिला का लपवतात त्यांचं वय
चाणाक्य नीतिनुसार, समाजात आदर आणि वैयक्तिक प्रतिष्ठा राखणं फार महत्वाचं आहे. महिलांनी त्यांचं वय लपवण्याचा उद्देश केवळ सामाजिक दबाव किंवा देखावा यांचा भाग नाही तर सुरक्षितता आणि संधी जपणं देखील आहे. महिला त्यांचं खरं वय लपवून समाजात त्यांचं मूल्य आणि स्थान टिकवून ठेवतात.पुरुष का लपवतात त्यांची सॅलरी?
पुरुष कायम त्यांची सॅलरी लपवतात कारण चाणक्य नीतीमध्ये असं सांगितलं आहे, की संपत्ती आणि शक्ती उघड केल्यानं संभाव्य धोके आणि स्पर्धा निर्माण होऊ शकते. पुरुषांची ही एक रणनीती आहे की त्यांनी त्यांची खरी आर्थिक परिस्थिती काही लोकांना सांगितली पाहिजे… ज्यामुळे त्यांना कोणतंही सामाजिक किंवा आर्थिक नुकसान सहन करावं लागू नये.
आजच्या काळात, वैयक्तिक सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक रणनीता एकमेकांशी जोडले गेले आहे. महिलांसाठी ते स्व-संरक्षण आणि सामाजिक अपेक्षांचा भाग आहे, तर पुरुषांसाठी ते आर्थिक संतुलन आणि जोखीम व्यवस्थापनाचा भाग आहे.
महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणाक्य (Chanakya Neeti Marathi) यांनी आपल्या नीतिने अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेले नीतिशास्त्र सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी आखलेली धोरणे आजही लोकांसाठी यशाची सूत्रे ठरतात.
