Satara: बैलगाडा शर्यत, कुस्त्या आणि मल्लखांब, साताऱ्यात जानूबाई देवीची यात्रा उत्साहात

Satara: बैलगाडा शर्यत, कुस्त्या आणि मल्लखांब, साताऱ्यात जानूबाई देवीची यात्रा उत्साहात

पश्चिम महाराष्ट्रात यात्रा उत्सवाला आता सुरुवात झालीय.साताऱ्यातील वाई तालुक्यातील बोपर्डी गावातील ‘जानूबाई’ देवीची यात्राही यंदा मोठ्या उत्साहात पार पडली.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 19, 2022 | 1:19 PM

पश्चिम महाराष्ट्रात यात्रा उत्सवाला आता सुरुवात झालीय.साताऱ्यातील (Satara) वाई  (Vai)तालुक्यातील बोपर्डी गावातील ‘जानूबाई’(JanuBai ) देवीची यात्राही यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त गावात बैलगाडा शर्यती, कुस्त्या, मल्लखांबसारख्या वेगवेगळ्या स्पर्धांचे, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेतील ‘छबीना’ नाकम पारंपारिक नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

दोन वर्षांनी यात्रा

कोरोना महामारीमुळे सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी प्रशासनाच्या निर्णयानुसार यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्याकाळात सर्व दुकाणं, सर्व मंदिरं, आस्थापना याकाळा बंद होत्या. त्यादरम्यान कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. दोन वर्षांनी यात्रा कोणत्याही निर्बंधाविना साजरी आली. त्यामुळे यंदा यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात्रेला मुंबई पुण्यातील लोक मोठ्या उत्साहात आले होते. शेजार पाजारच्या गावातील लोकांनी देखील यावेळी गावच्या यात्रेला हजेरी लावली होती.

यात्रेनिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन

यात्रेनिमित्त गावात बैलगाडा शर्यती, कुस्त्या, मल्लखांबसारख्या वेगवेगळ्या स्पर्धांचे, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेतील ‘छबीना’ नाकम पारंपारिक नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत.  तर अगदी लहानग्यांपासून ते एंशीतल्या आजोबांनीही स्वतःला वयाचं बंधन न घालता यात्रेत झांज वाजवत आपला सहभाग नोंदवला.

हे सुद्धा वाचा

सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

गावा बाहेरूनही हा सोहळा पाहण्यासाठी लोक आले होते. त्यामुळे यात्रेत तुफान गर्दी झाली होती. या सोहळ्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. पुरुषांची संख्याही लक्षणीय होती. गावातील गल्ल्यांमध्ये अलोट गर्दी उसळल्याने पाय ठेवायलाही जागा नव्हती. यावेळी अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरणही करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें