AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचू रत्न धारण केल्यामुळे तुम्हाला दिसतील हे शुभ परिणाम; सविस्तर जाणून घ्या विधी आणि नियम

बुध ग्रहाचे रत्न असलेल्या पाचू रत्नाची बुधवारीच खरेदी करा आणि ते कांस्य किंवा सोन्याची अंगठी किंवा लॉकेटमध्ये बनवा. पाचू रत्न कमीत कमी साडेतीन ते साडेसहा कॅरेट खरेदी करावी.

पाचू रत्न धारण केल्यामुळे तुम्हाला दिसतील हे शुभ परिणाम; सविस्तर जाणून घ्या विधी आणि नियम
पाचू रत्न धारण केल्यामुळे तुम्हाला दिसतील हे शुभ परिणाम
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 8:20 AM
Share

मुंबई : नशिबाची साथ असेल तर माणूस काहीही सध्या करू शकतो हे म्हणतात ते खोटे नाही. तुम्हीही याचा प्रत्यय घेऊ शकता. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी आणि करिअर-व्यवसाय मजबूत करण्यासाठी मानला जातो. असे मानले जाते की जर कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान आणि हजरजबाबी असते. प्रत्येकजण त्याच्या प्रतिभेचा विचार करतो, पण जर कुंडलीतील बुध ग्रह जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या करिअर-व्यवसायात खूप त्रास सहन करावा लागतो. बुध कमजोर असताना अनेकदा व्यक्तीला बोलण्यात दोष असतो. अशी व्यक्ती समाजात बोलताना अनेकदा संकोच करते किंवा घाबरते. ज्योतिषशास्त्रानुसार, कमजोर बुधाला मजबूत करण्यासाठी पाचू रत्न धारण केला जातो, जो बुध ग्रहासारखा हिरवा असतो. (You will see these auspicious results by wearing Pachu Ratna)

पाचू रत्न कोणी धारण करावे?

ज्योतिष शास्त्रानुसार, पाचू रत्न व्यापारी आणि विद्यार्थी वर्गासाठी अतिशय शुभ मानले जाते. यासह पाचू रत्न कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणामकारक सिद्ध होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर त्याला मजबूत बनवण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्याही ज्योतिषाचा सल्ला घेऊन पाचूचे रत्न धारण करू शकते. कलाविश्वाशी संबंधित लोकांसाठी हे सर्वोत्तम रत्न मानले जाते.

पाचू धारण करण्याची शुभ वेळ

बुध ग्रहाचे रत्न असलेल्या पाचू रत्नाची बुधवारीच खरेदी करा आणि ते कांस्य किंवा सोन्याची अंगठी किंवा लॉकेटमध्ये बनवा. पाचू रत्न कमीत कमी साडेतीन ते साडेसहा कॅरेट खरेदी करावी. जेव्हा पाचू रत्न अंगठीमध्ये बसवले जाते, तेव्हा ते पूजेनंतर सूर्योदयाच्या वेळी बुधवारी परिधान केले पाहिजे. जर तुम्हाला पाचू रत्नाऐवजी विधाराचे मूळ घालायचे असेल तर ते नेहमी मजबूत हिरव्या तार किंवा कपड्यात बांधून घाला.

पाचू रत्न धारण करण्याचे फायदे

बुधचे पाचू रत्न धारण केल्याने व्यक्तीची एकाग्रता वाढते आणि त्याची मानसिक पातळी चांगली राहते. पाचू रत्नाच्या शुभ प्रभावामुळे परीक्षा-स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला धार येते. पाचू रत्न धारण करणारी व्यक्ती चांगला वक्ता असते. पाचूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती आपल्या शब्दांनी समाजात सर्वांना आकर्षित करते. (You will see these auspicious results by wearing Pachu Ratna)

इतर बातम्या

सामान्य माणसाला आणखी एक धक्का; ऑनलाईन खरेदी लवकरच महागणार

मुंबई पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं ‘ऐ वतन तेरे लिए’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...