मुंबई : आपल्या देशात पोलीस दलामध्ये सर्वात जास्त चर्चा कोणाची होत असेल तर ते म्हणजे मुंबई पोलीस. एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यापासून ते शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत मुंबई पोलीस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. या बाबतीत मुंबई पोलिसांचा हात कोणीही धरू शकत नाही. बरं मुंबई पोलीस फक्त एवढ्याच कामात तरबेज आहेत असे नाही. तर या पोलिसांच्या बँड पथकाचीदेखील संपूर्ण भारतामध्ये चर्चा होत असते. सध्या याच बँडचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांच्या बँडने सादर केलेलं सादरीकरण भन्नाट आहे.