AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वरमाला टाकताना वधूची उंची कमी पडली, तेव्हा वराने जे केलं, ते पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं!

बऱ्याचदा वधू आणि वराच्या उंचीत फरक असतो, बहुदा नवरा मुलगा हा उंच असतो. आणि त्यावेळी गळ्यात वरमाला घालण्यासाठी वधुला चांगलीच कसरत करावी लागते.

Video: वरमाला टाकताना वधूची उंची कमी पडली, तेव्हा वराने जे केलं, ते पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं!
जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा वधूला खरी अडचण समजली.
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 10:33 AM
Share

लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. वैवाहिक जीवन सुरु करण्याची वधू -वरांना एकच घाई असते. लग्नातल्या वऱ्हाडी मंडळींच्या नजरा वधू-वरांवरच स्थिर असतात. दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. अशाच नवीन जोडप्याचे बरेच फनी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचदा वधू आणि वराच्या उंचीत फरक असतो, बहुदा नवरा मुलगा हा उंच असतो. आणि त्यावेळी गळ्यात वरमाला घालण्यासाठी वधुला चांगलीच कसरत करावी लागते. ( viral wedding video groom bride romantic moment funny video)

आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो देखील असाच आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, स्टेजवर वधू-वरापैकी वर हा वधूहून बराच उंच आहे. आतापर्यंत लग्नाचे सगळे सोपस्कार व्यवस्थित झाले, पण जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा वधूला खरी अडचण समजली. वराच्या उंचीमुळं तिने उडी मारली तरी हार वराच्या गळ्यात पडणं शक्य नाही. वधूचे प्रयत्न पाहुन वऱ्हाडी मंडळींमध्ये एकच हशा पिकला. पण तेवढ्यात वराने असं काही केलं, की लग्न मंडपातील सर्वांची मनं जिंकून घेतली.

जेव्हा वधू वराच्या गळ्यात वरमाला टाकण्याचा प्रयत्न करत होती. आणि प्रयत्न करुनही ती ते करु शकत नव्हती, तेव्हा वराने समजुतदारपणा दाखवला आणि स्टेजवर वधूसमोर गुडघ्यावर आला. खाली झुकला आणि वधुला वरमाला टाकण्यास सोईस्कर पोज दिली. त्यानंतर वधूने आनंदाने वरमाला त्याच्या गळ्यात टाकली. हे पाहून उपस्थित लोकांना चांगलाच आनंद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच पाहिला जात आहे. लोकांना वराचा समजूतदारपणा आवडलेला दिसतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडिओ Shystyles My Doll नावाच्या अकाऊंटवर पाहू शकता. व्हिडिओ पेजवर अपलोड होताच, लाखो लोकांनी त्याला पसंती दिली आणि लाईक कमेंट्सद्वारे भरपूर प्रेम दिलं. हा व्हिडिओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझा आवडता क्षण’. इतर अनेक नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

व्हिडिओवर एकाने लिहलं, ‘हा व्हिडिओ खूपच गोंडस आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘मी हे अनेक विवाहांमध्ये पाहिले आहे, हा प्रसंग लग्नाच्या सुंदर भागांपैकी एक आहे. याशिवाय, बहुतेक लोक इमोजी शेअर करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हेही पाहा:

घसरगुंडीवरचा स्टंट महागात, लोकांना हसू आवरेना, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बालपण आठवलं!

बैलानं 7 फुटाच्या भिंतीवरुन मारली जबरदस्त उडी, व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले!

 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.