एक चांगली सुरुवात…स्मृती मानधनाची अस्खलित मराठी ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न वडिलांच्या आजारपणामुळे पुढे ढकलले गेले, मात्र संगीतकार पलाश मुच्छलवरील आरोपांमुळे हे प्रकरण चिघळले. यामुळे स्मृतीने लग्नाचे फोटोही हटवले. एका बाजूला तिच्या क्रिकेटमधील कामगिरीने भारताला विश्वचषक जिंकून दिला, तर दुसऱ्या बाजूला WMPL बद्दल अस्खलित मराठीत बोलतानाचा तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या शुद्ध मराठीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु, स्मृतीचे वडील श्रीनिवास यांची लग्नाच्या दिवशी अचानक तब्येत बिघडल्याने ते पुढे ढकलण्यात आलं आहे. पण त्यानंतरही पलाशबाबत अशा काही घटना समोर आल्या ज्यावरून त्याने स्मृतीला फसवलं असे आरोप त्याच्यावर होताना दिसत आहे. याचवेळी स्मृतीने इ्न्स्टाग्रामवर तिच्या शेअर केलेले लग्नाचे-हळदीचे फोटो डिलिट केले. त्यानंतर स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. इतकच नव्हे तर, पलाशचे काही मुलीसोबतचे चॅट, रिलेशन अशा बऱ्याच गोष्टी व्हायरल झाल्याने या लग्नाला आता एक वेगळच वळण लागलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे त्याच चर्चा सुरु आहेत.
स्मृती क्रिकटेमधील कामगिरीमुळे कायम चर्चेत राहिली
स्मृती ही आता फक्त तिच्या लग्नामुळेच नाही तर स्मृती मानधना तिच्या क्रिकटेमधील कामगिरीमुळे कायम चर्चेत राहिली आहे. ती भारतीय क्रिकेट टीमची स्टार महिला क्रिकेटर आहे. नवी मुंबईत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. यासह, महिला क्रिकेटमध्येही भारतीय संघ विश्वविजेता ठरला. यात नक्कीच सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळ खेळला. त्यात नक्कीच स्मृतीचाही मोलाचा वाटा होता.
View this post on Instagram
स्मृती मानधनाचं अस्खलित मराठी
स्मृती ही सांगलीची मुलगी आहे. याच मॅचदरम्यानचा तिचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सुरु केलेलील WMPLबद्दल तिचे मत मांडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे स्मृती या व्हिडीओमध्ये WMPLची सुरुवात झाली त्याबद्दल आनंद व्यक्त करताना दिसत आहे. तिने म्हटलं की, “WMPL सुरु करणे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने केलेली एक चांगली सुरुवात आहे.” असं म्हणत तिने आनंद व्यक्त केला. पण यावेळी ती जे अस्खलित मराठी बोललं आहे ते ऐकून सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि या व्हिडीओला खूप प्रेम मिळत आहे.
