AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND 2nd test | कर्णधार अजिंक्य रहाणेची झुंजार अर्धशतकी खेळी, मानाच्या पंगतीत स्थान

अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीतील हे 23 वं अर्धशतक ठरलं.

AUS vs IND 2nd test | कर्णधार अजिंक्य रहाणेची झुंजार अर्धशतकी खेळी, मानाच्या पंगतीत स्थान
| Updated on: Dec 27, 2020 | 11:17 AM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND 2nd test) यांच्यात मेलबर्न येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील (Border Gavskar Trophy) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) खांद्यावर टीम इंडियाची नेतृत्वाची जबाबदारी आहे. रहाणेने गोलंदाजांचा अचूक वापर करत कांगारुंना पहिल्या डावात 195 रोखले. यानंतर फलंदाजीतही रहाणेने आपली चूणुक दाखवली. रहाणेने शानदार अर्धशतक ठोकलं. रहाणेच्या कसोटी कारकिर्दीतील हे 23 वं अर्धशतक ठरलं. यासह रहाणेला मानाच्या पंगतीत स्थान मिळालं आहे. (Ajinkya Rahane Become 5tH India Captain Who Scored 50 Against australia in boxing day test )

रहाणे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियविरोधात अर्धशतक लगावणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. याआधी टीम इंडियाकडून कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहलीने अशी कामगिरी केली होती. यामुळे रहाणे हा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी एकूण 61 धावांची भागीदारी केली. यानंतर युवा शुभमन गिल 45 धावावंर बाद बाद झाला. गिल मागोमाग चेतेश्वर पुजाराही 17 धावांवर माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली.

मात्र अशा स्थितीत रहाणेने आपल्यातले नेतृत्वाचे कौशल्य दाखवले. रहाणेने हनुमा विहारीच्या मदतीने स्कोअरकार्ड हलता ठेवला. यानंतर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. यानंतर हनुमा विहारीही 21 धावांवर बाद झाला.

यानंतर रिषभ पंत मैदानात आला. रहाणे-पंत जोडीने पाचव्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या. टीम इंडियाकडून चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पंत 29 धावा करुन तंबूत परतला. मात्र या भागीदारीला शतकी भागीदारीत बदलता आले नाही. पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जाडेजा मैदानात आला. रहाणेने चौकार ठोकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 23 वं अर्धशतक साजरं केलं.

संबंधित बातम्या :

Ind Vs Aus : अजिंक्य रहाणे- मराठमोळा झुंजार सेनापती

(Ajinkya Rahane Become 5tH India Captain Who Scored 50 Against australia in boxing day test)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.