Anaya Bangar : विराट कोहलीशी अनाया बांगरची खास बातचीत, काय मिळाला सल्ला?, Video व्हायरल
अनाया बांगरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहलीशी बातचीत दाखवली आहे. विराटने फलंदाजीसाठी खास टिप्सही दिल्या.

भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि कोच राहिलेले संजय बांगर यांची मुलगी अनाय बांगर नेहमी चर्चेत असते. आधी मुलगा असलेला आर्यन हा जेंडर ट्रॉन्स्फॉर्मेशन करून मुलगी बनला आणि त्याने अनाया हे नाव धारण केलं. त्याच अनाा बांगरने आता तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंवर एक व्हिडीओ शेअर केला , ज्यामध्ये विराट कोहलीशी झालेला संवाद दाखवण्यात आला आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच तो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून अनेक लोकांनी को लाईक करून त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये विराट कोहली हा एका मुलाला बॅटिंग टिप्स देताना दिसतोय, बॅटिंग संदंर्भात त्यांची बरीच बातचीत झाली. मात्र विराट ज्याच्याशी बोलतोय ती व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून अनाया बांगरंच आहे. खरंतर हा व्हिडीओ तिच्या जेंडर चेंज ट्रान्स्फॉर्मेशन पूर्वीचा आहे. आर्यन बांगर असताना विराटशी झालेली बातचीत या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ बराच जुना आहे. आता आर्यनची अनाया बांगर झाली आहे.
View this post on Instagram
अनायाचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल
खुद्द अनायानेच हा व्हिडीओ सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला असून त्यासोबत एक कॅप्शनही लिहीली आहे. ‘ त्यावेळी एक (लहान) मुलगा विराटकडून टिप्स ऐकत होता. भारतीय महिला संघात स्थान मिळवण्यासाठी, एका संधीसाठी आज मी लढत आहे. काही स्वप्न कधीच बदलत नाहीत ‘ असं तिने व्हिडीओसोबत लिहीलंय. अनाया बांगरला क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम असून तिने सोशल मीडिया अकाऊंवरही अनेक व्हिडीओ शेअर केलेत, ज्यात ती बॅटिंग करताना दिसत्ये.
अनाया बांगर नेहमीच विराट कोहलीची स्तुती करताना दिसते. तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की जेव्हा तिचे वडील संजय बांगर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते तेव्हा विराट कोहली त्यांच्यासोबत खूप सराव करायचा. तेव्हा ती त्याला एकदाच नव्हे, अनेकदाभेटली होती. तेव्हा अनायाने सांगितलं होतं की विराट बऱ्याचदा मजा करायचा, पण जेव्हा तो बॅटिंग प्रॅक्टिस करायचा तेव्हा त्याचं संपूर्ण लक्ष त्यावरच असायचं, अतिशय गंभीरपणे तो प्रॅक्टिस करायचा.
आर्यन बनला अनाया
आता अनाया बांगर नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती आधी एक मुलगा होती, तेव्हा त्याचं नाव आर्यन होतं. तो संजय बांगरचा मुलगा म्हणून ओळखला जायचा, खूप क्रिकेट खेळायचा. डावखुरा फलंदाज असलेला आर्यन हा डावखुरा फिरकी गोलंदाजही होता. पण काही काळापूर्वी आर्यनने जेंडर चेंज ऑपरेशन केलं आणि तो मुलगी बनला, त्याने अनाया नाव धारण केलं. ती अनेकदा तिच्या जेंडर चेंज बद्दल मोकळेपणाने बोलत असते, त्याबद्दलचे व्हिडीओही शेअर करते.
