वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या खेळाडूंना संधी

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीच्या आजच्या बैठकीनंतर एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी ही घोषणा करण्यात आली. या दौऱ्यामध्ये भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 'या' नव्या खेळाडूंना संधी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 22, 2019 | 4:34 PM

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीच्या आजच्या बैठकीनंतर एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी ही घोषणा करण्यात आली. या दौऱ्यामध्ये भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहे. काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर काही आधीच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.

या नव्या संघात सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. तसेच खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही बाजूला करण्यात आले. या सर्व खेळाडूंच्या जागेवर 8 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, राहुल चहर, दिपक चहर, नवदीप सैनी, हनुमा विहारी अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय संघ (टी-20 मालिका)

 • विराट कोहली (कर्णधार)
 • रोहित शर्मा (उप-कर्णधार)
 • शिखर धवन
 • केएल राहुल
 • श्रेयस अय्यर
 • मनिष पांडे
 • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
 • कृणाल पंड्या
 • रविंद्र जाडेजा
 • वॉशिंग्टन सुंदर
 • राहुल चहर
 • भुवनेश्वर कुमार
 • खलील अहमद
 • दीपक चहर
 • नवदीप सैनी

भारतीय संघ (वन-डे मालिका)

 • विराट कोहली (कर्णधार)
 • रोहित शर्मा (उप-कर्णधार)
 • शिखर धवन
 • केएल राहुल
 • श्रेयस अय्यर
 • मनिष पांडे
 • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
 • कृणाल पंड्या
 • रविंद्र जाडेजा
 • कुलदीप यादव
 • युजवेंद्र चहल
 • केदार जाधव
 • मोहम्मद शामी
 • भुवनेश्वर कुमार
 • खलील अहमद
 • नवदीप सैनी

भारतीय संघ (कसोटी मालिका)

 • विराट कोहली (कर्णधार)
 • अजिंक्य राहाणे (उप-कर्णधार)
 • मयांक अग्रवाल
 • के. एल. राहुल
 • सी. पुजारा
 • हनुमा विहारी
 • रोहित शर्मा
 • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
 • रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक)
 • आर. अश्वीन
 • रविंद्र जाडेजा
 • इशांत शर्मा
 • मोहम्मद शामी
 • जसप्रित बुमराह
 • उमेश यादव

याआधी ही बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती, मात्र प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या सचिवांऐवजी प्रमुखांनी ही बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ही बैठक आज (रविवारी) घेण्यात आली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, राहुल चहर, दिपक चहर, नवदीप सैनी, हनुमा विहारी अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

धोनीच्या निवृत्तीचा विषय या बैठकीच्या केंद्रभागी असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्याआधीच धोनीने आपण उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने तो प्रश्नही संपला होता. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.

पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वचषकाचा विचार करता निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. धोनीच्या जागी युवा खेळाडू रिषभ पंतला जागा देण्यात आली आहे. विश्वचषकातही पंतला शिखर धवनच्या दुखापतीनंतर बोलावण्यात आले होते.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें