Syed Mushtaq Ali Trophy साठी मुंबईची घोषणा, सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, अर्जून तेंडुलकरला डच्चू

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Syed Mushtaq Ali Trophy साठी मुंबईची घोषणा, सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, अर्जून तेंडुलकरला डच्चू
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 3:13 PM

मुंबई : सय्य्द मुश्ताक अली टी 20 स्पर्धेसाठी (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 20 सदस्यीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सलील अंकोल यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या निवड समितीने शनिवारी 26 डिसेंबरला मुंबई संघाची घोषणा केली. आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) मुंबईचे नेतृत्व देण्यात आले आहे. (Announcement of Mumbai team for Syed Mushtaq Ali t20 Trophy)

अर्जून तेंडुलकरला डच्चू

या सय्य्द मुश्ताक अली स्पर्धेसाठी अर्जून तेंडुलकरला (Arjun Tendulkar) डच्चू देण्यात आला आहे. निवड समितीने अर्जूनला 20 सदस्यीय मुंबई संघात दिले नाही. अर्जूनला संघात स्थान द्यायचं की नाही यावरुन निवड समितीमध्ये मतभेद होते. तसेच अर्जूनला संधी देण्यासाठी निवड समितीतील काही सदस्य हे आग्रही होते. पण काहींचा तीव्र विरोध होता.

सराव सामन्यात निराशाजनक कामगिरी

अर्जून तेंडुलकरने 4 सराव सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. अर्जूनने या 4 सराव सामन्यात टीम D कडून खेळला. अर्जूनने यामध्ये केवळ 4 विकेट्स घेतल्या. तसेच अर्जूनला 3 वेळा फलंदाजीची संधी मिळाली. मात्र त्याला बॅटिंगनेही चमक दाखवता आली नाही. अर्जूनने केवळ 7 धावाच केल्या.

मुंबईच्या फलंदाजीची जबाबदारी अदित्य तारे, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि शिवम दुबेच्या खांद्यांवर असणार आहे. तसेच बोलिंगची मदार धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडेकडे असेल. तर फिरकी गोलंदाजीसाठी संघात अर्थव अंकोलेकर आणि शम्स मुलानी यांना स्थान देण्यात आलं आहे.

खेळाडूंना कोरोना चाचणी बंधनकारक

मुश्ताक अली टी 20 स्पर्धेसाठी मुंबईचा संघ 29 डिसेंबरपासून सरावाला सरुवात करणार आहे. मात्र या सरावासाठी एक अट असणार आहे. सराव करणाऱ्या खेळाडूंना आपली स्वत:ची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूला सरावासाठी परवानगी मिळणार आहे.

असा आहे मुंबई संघ : सुर्यकुमार यादव ( कर्णधार), आदित्य तरे ( उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे,  शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारडे, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे, आकाश पारकर आणि सुफीयां शेख

संबंधित बातम्या :

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला, 44 बॉलमध्येच धडाकेबाज शतक

(Announcement of Mumbai team for Syed Mushtaq Ali t20 Trophy)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.