वेस्ट इंडिजमध्ये खेळत असलेल्या मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट

वारंवार सांगूनही तो (Arrest warrant Mohammed Shami) हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आला. शमीला या वॉरंटविरोधात जामीन मागण्यासाठी किंवा हजर होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधीही कोर्टाकडून देण्यात आलाय.

वेस्ट इंडिजमध्ये खेळत असलेल्या मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट

कोलकाता : भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात (Arrest warrant Mohammed Shami) पश्चिम बंगालमधील कोर्टाने अटक वॉरंट जारी केलाय. कौटुंबीक हिंसाचार प्रकरणी शमी आणि त्याच्या भावावर आयपीसी कलम 498A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवार सांगूनही तो (Arrest warrant Mohammed Shami) हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आला. शमीला या वॉरंटविरोधात जामीन मागण्यासाठी किंवा हजर होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधीही कोर्टाकडून देण्यात आलाय.

वाचा – शमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल

शमीची पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) कौटुंबीक छळाचा आरोप केल्यानंतर शमी आणि त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शमीवर त्याच्या पत्नीने मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता, ज्यात त्याला बीसीसीआयकडून क्लीनचिट देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता शमीच्या पत्नीने माध्यमांसमोर येऊन अनेक सनसनाटी आरोप केले.

शमी सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दरम्यान, आरोपपत्र पाहिल्यानंतरच शमीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. वॉरंट जारी केल्याचं बीसीसीआयला माहित आहे. एकदा आम्हाला आरोपपत्र पाहावं लागेल आणि मगच काय तो निर्णय घ्यावा लागेल. आत्ताच काही बोलणं हे घाईचं होईल, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना सांगितलं.

वाचा – मोहम्मद शमीची हॅटट्रिक आणि भारताचा विजय, शेवटच्या षटकाचा थरार

यापूर्वी शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आल्यानंतर त्याचं कंत्राट थांबवून चौकशी करण्यात आली होती. पण चौकशीत काहीही सिद्ध न झाल्यानंतर त्याच्यासाठी पुन्हा एकदा भारतीय संघाची दारं खुली झाली. शमीने गेल्या काही दिवसांपासून शानदार कामगिरी केली आहे. सध्या तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अंतिम 11 मध्ये प्रतिनिधित्व करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *