शमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल

आता कुठे मोहम्मद शमी त्याची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना, परत एका मुलीने त्याच्यावर आरोप केले आहेत. सोफिया असे या शमीवर आरोप करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

शमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल

मुंबई : मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या नाकीनऊ आणणाऱ्या मोहम्मद शमीच्या मागे लागलेलं ग्रहण संपण्याचे काही नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शमीची पत्नी हसीन जहाने शमीवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले होते. त्यानंतर आता एका मुलीने शमी सतत मॅसेज करत असल्याचा आरोप केला आहे.

काही महिन्यांपूर्वी हसीनने शमी व त्याचे कुटुंबीय मला हुंड्यासाठी मारहाण करतात असा आरोप केला होता. यामुळे त्याला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. यानतंर आता कुठे तो त्याची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना, आता परत एका मुलीने त्याच्यावर आरोप केले आहेत. सोफिया असे या शमीवर आरोप करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

सोफियाने केलेल्या आरोपानुसार, “हा कोण क्रिकेटर आहे ज्याला मी ओळखत नाही. पण तो दर दिवशी इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन मला GOOD AFTERNOON चे मेसेज पाठवतो, असे तिने सांगितले आहे.” विशेष म्हणजे तिने पुरावा म्हणून शमीच्या सोशल अकाऊंटवरुन पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. “या सोबतच तिने हा 1.4 मिलीयन फॉलोअर्स असणारा क्रिकेटर मला सतत का मेसेज करतो हे कोणी मला सांगेल का असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.”

सोफियाच्या या आरोपामुळे शमीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरुन ट्विटरवर मोहम्मद शमीला चांगलंच ट्रोल केल जात आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी हसीनने मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्याविरोधात केसही दाखल केली होती.

काही दिवसांपूर्वी हसीनने शमीच्या टिक टॉकवरुन त्याच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी हसीनने शमी त्याच्या टीक टॉक अकाऊंटवरुन केवळ 97 जणांना फॉलो करतो. त्यातील 90 टीक टॉक अकाऊंट हे फक्त मुलींचे असल्याचा हसीन जहाने म्हटलं होतं. त्याशिवाय याबाबतचा स्क्रिनशॉटही तिने तिच्या फेसबुकवर शेअर केला होता.

संबंधित बातम्या : 

शमीचे जगभरात कौतुक, पण बायको म्हणते एका मुलीचा बाप असूनही लाज वाटत नाही!

शमीची पुन्हा एकदा घातक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा

आधी फलंदाजी आणि नंतर हवेत झेल, धोनीला चाहत्यांचा सलाम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *