Australia vs India, 2nd Test | विकेटकीपर टीम पेनचा शानदार एकहाती कॅच, चेतेश्वर पुजारा तंबूत

चेतेश्वर पुजाराने 17 धावा केल्या.

Australia vs India, 2nd Test | विकेटकीपर टीम पेनचा शानदार एकहाती कॅच, चेतेश्वर पुजारा तंबूत

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs  Team India 2nd Test) यांच्यात मेलबर्नमध्ये (MCG) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर चेतेश्ववर पुजारा आणि शुभमन गिल नॉट आऊट होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. गिल-पुजाराने दुसऱ्या दिवशी आश्वासक सुरुवात दिली. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 61 धावांची भागीदारी केली. यानंतर शुभमन गिल 45 धावांवर आऊट झाला. गिल मागोमाग चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) कॅच आऊट झाला. (aus vs ind 2nd test wicket keeper tim paine take cheteshwar pujara one handed catch)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेटकीपर टीम पेनने पुजाराचा स्टंपमागे हवेत झेपावत भन्नाट कॅच घेतला. पॅट कमिन्स 24 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील चौथा चेंडू पुजारा हुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र चेंडू बॅटला स्पर्श करुन विकेटकीपर आणि पहिल्या स्लीपच्या मधील दिशेने गेला. विकेटकीपर पेनने वेळीच उडी घेत पुजाराचा कॅच घेतला. पुजाराला आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र टीम पेनच्या अफलातून कॅचमुळे पुजाराच्या खेळीला ब्रेक लागला.

पुजाराने 70 चेंडूत 1 चौकारासह 17 धावांची खेळी केली. टीम पेनमुळे चेतेश्वर पुजाराची महत्वाची विकेट मिळाली. पुजाराच्या रुपात टीम इंडियाला तिसरा झटका बसला.

पुजारासाठी 2020 अनलकी

पुजारा टेस्ट स्पेशालिस्ट फंलदाज आहे. पुजाराला टीम इंडियाचा तारणहार समजलं जातं. जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत असते, तेव्हा तेव्हा पुजारा टीम इंडियाला सावरतो. मात्र 2020 हे वर्ष पुजारासाठी फारस चांगलं राहिलं नाही. पुजाराने 2020 मध्ये एकूण 7 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 2 वेळा 30 तर एकदाच अर्धशतक लगावलं आहे. तर त्याचा स्ट्राईक रेटही 50 पेक्षा कमी आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND 2nd test | कर्णधार रहाणेची झुंजार अर्धशतकी खेळी, मानाच्या पंगतीत स्थान

(aus vs ind 2nd test wicket keeper tim paine take cheteshwar pujara one handed catch)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI