Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ रवींद्र जाडेजाही जायबंदी, हाताच्या डाव्या अंगठ्याला दुखापत

रिषभ पंतनंतर आता रवींद्र जाडेजाला दुखापत झाली आहे. जाडेजाच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ रवींद्र जाडेजाही  जायबंदी, हाताच्या डाव्या अंगठ्याला दुखापत
रवींद्र जाडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत.

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात सिडनीत तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. तिसरा दिवस टीम इंडियासाठी अडचणी घेऊन आला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) पाठोपाठ आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाही (Ravindra Jadeja) दुखापतग्रस्त झाला आहे. जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. जाडेजाला पहिल्या डावात फलंदाजी करताना ही दुखापत झाली आहे. यामुळे जाडेजाच्या दुखापत झालेल्या अंगठ्याचं स्कॅन रिपोर्ट काढण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे. (aus vs ind 3rd test ravindra Jadeja suffered blow to his left thumb while batting)

बीसीसीआयने केलेलं ट्विट

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी हारकिरी केली. मात्र जाडेजाने शेपटीच्या फलंदाजांसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान मिचेल स्टार्क गोलंदाजी करायला आला. स्टार्कने शॉर्ट पिच बोल जाडेजाने हुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने उसळी घेतली. यामुळे जाडेजाड्या अंगठ्याला दुखापत झाली.

बोटाला चेंडू लागल्याने जाडेजाला वेदना झाली. यानंतर टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल मैदानात धावत आले. पटेल यांनी जाडेजाच्या अंगठ्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र या दुखापतीमुळे जाडेजाला पुढे खेळ सुरु ठेवता आला नाही. यामुळे जाडेजा 28 धावांवर नाबाद परतला.

या दुखापतीनंतर जाडेजा दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी हाताला पट्टी बांधून उतरला. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रशिक्षक आणि फिजीओंसोबत चर्चा केली. यानंतर जाडेजाला मैदानाबाहेर पाठवण्यात आले.

दरम्यान जाडेजाला झालेल्या या दुखापतीवर रुग्णालयात आवश्यक ते उपचार केले जाणार आहेत. यानंतर जाडेजाच्या दुखापतीबाबत पुढील माहिती देण्यात येणार आहे.

रिषभ पंतही दुखापतग्रस्त

याआधी रिषभ पंतलाही दुखापत झाली. या दुखापतीमुळे मैदानाबाहेर बसावे लागले आहे. पंतला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पहिल्या डावात फलंदाजी करताना डाव्या कोपऱ्याला चेंडू लागला. यानंतर मैदानात पंतवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र यांनतर पंत 36 धावा करुन माघारी परतला. पंतला दुखापतीमुळे सामन्याच्या तिसऱ्या डावात विकेट कीपिगंसाठी येणं शक्य झालं नाही. यामुळे पंतच्या जागी हनुमा विहारी कीपिंगासाठी आला. पंतवरही रुग्णालयात आवश्यक ते उपचार केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 3rd Test, 3rd Day Live : ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त

(aus vs ind 3rd test ravindra Jadeja suffered blow to his left thumb while batting)

Published On - 12:18 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI