AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Ind 3Rd Test | “पुजारामुळे टीम इंडियाची पहिल्या डावात वाताहात झाली”, झुंजार अर्धशतकानंतरही ‘या’ दिग्गाचा घणाघात

चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत 50 धावांची खेळी केली.

Aus vs Ind 3Rd Test | पुजारामुळे टीम इंडियाची पहिल्या डावात वाताहात झाली, झुंजार अर्धशतकानंतरही 'या' दिग्गाचा घणाघात
पुजाराने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 50 धावांची खेळी केली.
| Updated on: Jan 09, 2021 | 3:08 PM
Share

सिडनी : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टीम इंडियाचा (Team India) संकटमोचक म्हणून ओळखला जातो. पुजारा टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज आहे. टीम इंडिया अडचणीत असते, तेव्हा पुजारा निर्णायक भूमिका बजावतो. ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या कसोटीत  (Aus vs Ind 3rd Test) असंच पाहायला मिळालं. इतर फलंदाज कांगारुंच्या गोलंदाजीसमोर बाद होत होते. मात्र पुजाराने त्याच गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्याचा सामना केला. यासह त्याने झुंजार अर्धशतक केलं. मात्र यानंतरही तो टीकेचा धनी झाला आहे. पुजारामुळेच टीम इंडियाची पहिला डावात वाताहात झाली, असा घणाघात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) पुजारावर केला आहे. (aus vs ind 3rd test ricky ponting criticized on cheteshwar pujara)

पुजाराचे झुंजार अर्धशतक

पॉन्टिंग काय म्हणाला ?

पुजाराने पहिल्या डावात झुंजार अर्धशतक केलं. मात्र यानंतरही पॉन्टिंगने पुजारावर निशाणा का साधला, असा प्रश्न पुजारा समर्थकांना पडला आहे. पुजारावर टीका करण्याचं कारणही तसंच आहे. पुजाराने अतिशय संथ खेळी केली. यावरुन पॉन्टिंगने पुजाराला लक्ष्य केलं आहे. ” पुजारा फार सावकाश खेळला. यामुळे या संथ खेळीचा दबाव इतर फलंदाजांवर आला. पुजाराने असं करायला नको. पुजाराने खेळात वेग वाढवायला हवा. पुजारा सध्या जसा खेळतोय, त्याबाबत त्याने आत्मचिंतन करायला हवं”, असं पॉन्टिंग म्हणाला.

पुजाराच्या 176 चेंडूत 50 धावा

पुजाराने ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. पुजाराने एकूण 176 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार लगावले. विशेष म्हणजे पुजाराने या पहिल्या 100 चेंडूमध्ये विना चौकार अवघ्या 16 धावा केल्या.

कमिन्सची ठरलेली विकेट

पॅट कमिन्सच (Pat Cummins) पुजाराला आऊट करणार, असं समीकरण या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत तयार झालं आहे. या मालिकेत पॅटने पुजाराला 5 पैकी एकूण 4 वेळा आऊट केलं आहे.

टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. पुजारा या विजयाचा हिरो ठरला होता. पुजाराने या कसोटी मालिकेत एकूण 3 शतक लगावले होते. मात्र यंदाच्या दौऱ्यात पुजाराला आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरोधातील या कसोटी मालिकेत आतापर्यंत 5 डावात अवघ्या 113 धावा केल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतकाचा समावेश आहे.

तिसऱ्या सामन्याची थोडक्यात माहिती

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 338 धावा केल्या. यानंतर कांगारुंनी भारताचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. यामुळे ऑस्ट्रेलियााला दुसऱ्या डावात 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसखेर 2 विकेट गमावून 103 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त

Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत

Ravichandran Ashwin | अश्विनच्या फिरकीवर भल्याभल्यांची गिरकी, मुरलीधरनचा विक्रम मोडला

(aus vs ind 3rd test ricky ponting criticized on cheteshwar pujara)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.