Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त

पंतला पहिल्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापत झाली.

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त
रिषभ पंतला दुखापत

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा (Aus vs Ind 3rd Test) खेळ सुरु आहे. या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. विकेटकीपर रिषभ पंतला (Rishabh Pant) दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे पंतला दुसऱ्या डावात विकेटीकीपिंगसाठीही येता आले नाही. यामुळे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का समजला जात आहे. पंतच्या जागी रिद्धीमान साहा (Wriddhiman Saha) मैदानात किपींग करतोय. दरम्यान पंतवर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. याबाबतची माहिती बीसीसीआयने (Bcci) ट्विट द्वारे दिली आहे. (aus vs ind 3rd test rishabh pant was hit on the left elbow while batting)

बीसीसीआयने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

नक्की काय झालं?

पॅट कमिन्सच्या गोलंदाजी करत होता. पॅटने टाकलेला चेंडू बाऊन्सर येईल, असं पंतला वाटलं. पण पंतचा अंदाज चुकला. चेंडू बाऊन्स झालाच नाही. यामुळे तो चेंडू पंतच्या डाव्या कोपऱ्याला लागला. पंतला झालेल्या या दुखापतीमुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. पंतवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक मैदानात आले. त्यांनी पंतवर प्राथमिक उपचार केले. यानंतर पंतने पुन्हा खेळायला सुरुवात केली. या दुखापतीनंतरही पंतने झुंजार खेळी केली. पंतने 67 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावांची झुंजार खेळी केली.

टीम इंडियाचा डाव 244 धावांवर आटोपला. मात्र दुसऱ्या डावात विकेटकीपींगसाठी पंत मैदानात आला नाही. त्या जागी रिद्धीमान साहा मैदानात आला. पंतवर रुग्णालयात आवश्यक ते उपचार केले जाणार आहेत. या उपचारांनंतरच पंत खेळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

पंत मैदानात न आल्याने क्रिकेट चाहत्यांकडून भिती व्यक्त केली जात आहे. तसेच पंतला झालेली दुखापत ही गंभीर असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान पंतला या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागले तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. याआधी टीम दुखापतीमुळे टीम इंडियाच्या इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादवला कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 3rd Test, 3rd Day Live : ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट

(aus vs ind 3rd test rishabh pant was hit on the left elbow while batting)

Published On - 11:34 am, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI