IPL सुरु होण्याअगोदरच मोठा झटका, 30 खेळाडू खेळू शकणार नाही!

IPL सुरु होण्याअगोदरच मोठा झटका, 30 खेळाडू खेळू शकणार नाही!
जगभर कोरोनाची वक्रदृष्टी असताना क्रिकेटसाठी UAE सुरक्षित आहे...

खेळाडूंचं व्यस्त वेळापत्रक पाहता, आमच्या खेळाडूंना उर्वरित आयपीएल स्पर्धा खेळणं शक्य नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं मत आहे. तसंच ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील पुढचे काही महिने व्यक्त आहेत. (Australia And England Player not Available to play IPL 2021 In UAE)

Akshay Adhav

|

May 29, 2021 | 3:05 PM

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत (IPL 2021 UAE) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. परंतु आयपीएल हंगाम सुरु होण्यापूर्वीच विविध आयपीएल फ्रेंचायजींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत भाग घेणार नसल्याचं समोर येतंय. काही मीडिया रिपोर्टनुसार इंग्लंड आणि ऑस्ट्र्लियाचे खेळाडू व्यस्त असल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत त्यांना भाग घेता येणं शक्य नाहीय. (Australia And England Player not Available to play IPL 2021 In UAE)

खेळाडूंचं व्यस्त वेळापत्रक पाहता, आमच्या खेळाडूंना उर्वरित आयपीएल स्पर्धा खेळणं शक्य नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं मत आहे. तसंच ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील पुढचे काही महिने व्यक्त आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे मिळून जवळपास 30 खेळाडू खेळू शकत नाही, अशी माहिती समोर येत आहे. एकंदरित आयपीएल फ्रेंचायजींचा याचा मोठा फटका बसणार आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू व्यस्त

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला तीन ते चार मालिका खेळायच्या आहेत. कांगारुंना बांगलादेशविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका देखील खेळायची आहे. अतिशय कडक कोव्हिड प्रोटोकोल पाहता ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील आयपीएलच्या उर्वरित भाग घेण्याची शक्यता कमी आहे.

जवळपास 30 खेळाडूंची आयपीएलमधून माघार?

आयपीएल 2021 च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचे 18 आणि इंग्लंडचे 12 खेळाडू खेळले होते. त्यानुसार, आता सप्टेंबर-ऑक्टोंबर 2021 मध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेत दोन्ही देशांतील एकूण 30 खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळे आयपीएलचा 14 वा उर्वरित हंगाम सुरु होण्यापूर्वी हा मोठा धक्का आहे.

वेस्ट इंडिजचे खेळाडू सहभागी होणार?

दुसरीकडे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची (Caribbean Premier League) घोषणा केली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगचं नववं सत्र 28 ऑगस्टपासून सुरू होईल. सुमारे एक महिन्यापर्यंत चालणार्‍या लीगचा अंतिम सामना 19 सप्टेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यातच सीपीएल स्पर्धा पार पडत असल्याने वेस्ट इंडिडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत भाग घेतील का?, याबाबत साशंकता आहे.

(Australia And England Player not Available to play IPL 2021 In UAE)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें