तुला कापून टाकेन, वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला ‘लाईव्ह’ धमकी

या क्रिकेटपटूने वर्ल्ड कप 2019 मध्ये एकूण 606 धावा केल्या होत्या.

तुला कापून टाकेन, वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला 'लाईव्ह' धमकी
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 12:53 PM

ढाका : बांगलादेशचा (Bangladesh) अनुभवी क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे (Facebook Live) ही धमकी देण्यात आली आहे. बांगलादेशातील एका 33 वर्षीय इसमाने ही धमकी दिली आहे. 15 नोव्हेंबरला या इसमाने फेसबुक लाईव्ह केलं होतं. यावेळेस त्याने शाकिबला जीवे मारण्याची धमकी दिली. शाकिबने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याला मी जिवंत सोडणार नाही, मी त्यांचे तुकडे तुकडे करीन, अशी धमकी देण्यात आली आहे. मोहसिन तालुकदार असं या धमकी देणाऱ्याचं नाव आहे. बांगलादेशातील सिलहटयेथील शाहपुर येथून मोहसिनने 15 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 6 मिनिटांनी  फेसबुक लाईव्ह केलं होतं. या दरम्यान त्याने शाकिबला ढाक्यात जावून जीवे मारेन, अशी धमकी दिली. bangladesh all rounder shakib al hasan has been threatened with death via facebook live

Shakib Al Hasan death threat Facebook Live bangladesh cricket team

नक्की प्रकरण काय?

सूत्रांनुसार, शाकिब 12 नोव्हेंबरला कोलकाताला गेला होता. यावेळेस शाकिबने काली मातेच्या पूजेत सहभाग घेतला. यानंतर शाकिब गेल्या शुक्रवारी बांगलादेशला परतला. मात्र शाकिबने याचं खंडन केलं आहे. आणि एक व्हिडीओद्वारे आपली बाजू मांडली आहे. “मी काली मातेच्या पूजेचं उद्घाटन केलं नाही. काली माताच्या पूजेच्या निमंत्रण पत्रिकेत कोणा दुसऱ्याचंच नाव आहे. मी या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. मी दुसऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे गेलो होतो. तिथे कोणत्याच प्रकारे धार्मिक कार्यक्रमाबाबत चर्चा झाली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर मी गाडीच्या दिशेने निघालो. तेव्हा केवळ दीप प्रजव्लन करण्याची मला विनंती करण्यात आली. या प्रकरणी मला विनाकारण गोवण्यात येत आहे”, असं शाकिब या व्हिडीओत म्हणाला आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणाचा सायबर सेल टीम अधिक तपास करत आहे. शाकिबने काली मातेच्या पूजेत सहभागी झाल्याच्या रागातून मोहसिनचा झळफळाट झाला. या रागातून त्याने हे पाऊलं उचललं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दंड थोपाटले आहेत. “आम्ही मोहसिनच्या फेसबुक लाईव्हची लिंक सायबर सेल टीमला पाठवली आहे. लवकरच या प्रकरणी मोहसिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, अशी माहिती सिलहटचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त बीएम अशरफ यांनी दिली.

शाकिबने 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार कामिगरी केली होती. शाकिबने 8 सामन्यांमध्ये 86.57 च्या सरासरीने आणि 96.03 च्या स्ट्राइक रेटने 606 धावा केल्या. यामध्ये शाकिबने 4 अर्धशतकं आणि 2 शतकं लगावली होती. तसेच त्याने 11 विकेट्सही घेतल्या होत्या. यासह शाकिबने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

संबंधित बातम्या :

U19 World Cup Final : टीम इंडियाचा पराभव, बांगलादेश पहिल्यांदाच विश्वविजेता

bangladesh all rounder shakib al hasan has been threatened with death via facebook live

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.