IPL 2020 | बीसीसीआयचं एक पाऊल मागे, आयपीएल लांबणीवर!

बीसीसीआयने आयपीएल क्रिकेट सामन्यांना 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. ( BCCI decided to suspend IPL 2020 till 15th April)

IPL 2020 | बीसीसीआयचं एक पाऊल मागे, आयपीएल लांबणीवर!
Follow us
| Updated on: Mar 13, 2020 | 3:18 PM

मुंबई : कोरोनाचा वाढता कहर पाहता अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI suspended IPL 2020) एक पाऊल मागे घेतलं आहे. बीसीसीआयने आयपीएल क्रिकेट सामन्यांना 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. येत्या 29 मार्चपासून आयपीएलचं वेळापत्रक नियोजित होतं. मात्र कोरोनामुळे अनेक राज्यांनी या स्पर्धा भरवण्यास असमर्थता दर्शवल्याने, आयपीएल स्पर्धा आता लांबणीवर पडली आहे. (BCCI suspended IPL 2020)

खबरदारीचा उपाय म्हणून 15 एप्रिलपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही सार्वजनिक आरोग्याबद्दल संवेदनशील आहोत. आयपीएलशी संबंधित सर्व घटक, चाहते यांना सुरक्षित क्रिकेटचा अनुभव घ्यावा, यासाठी आम्ही ही पावलं उचलत आहोत, असं बीसीसीआयने म्हटलं.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला महामारी घोषित केली आहे. भारताने 15 एप्रिलपर्यंत देशाच्या सीमा बंद करत व्हिजावरही प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे परदेशी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये सहभागी होणं कठीण होतं.

अनेक राज्यांचा नकार

कोरोनामुळे अनेक राज्यांकडून आयपीएलच्या आयोजनाला नापसंती दर्शवली होती. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही गर्दी टाळण्यासाठी अशा स्पर्धांना नापसंती दर्शवली होती. आयपीएल सामने विनाप्रेक्षक खेळविण्याबाबतचा प्रस्ताव सरकारने दिला होता.  महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, केरळ, दिल्ली सरकारनेही आयपीएलच्या आयोजनाला नकार दिला होता.

कोरोनाचा फटका

दरम्यान आयपीएल 2020 ला 29 मार्चपासून सुरुवात होणार होती. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची लढत होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार होता. त्याआधी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिका आहे. 12 मार्च, 15 मार्च आणि 18 मार्च असे तीन वन डे सामने होणार आहेत. त्यानंतर 11 दिवसांनी म्हणजे 29 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार होती. तर अंतिम सामना 24 मे रोजी खेळवण्यात येणार होता.  मात्र आता आयपीएलला सुरुवातच 15 एप्रिलला होणार असल्याने, हे वेळापत्रक आणखी लांबणार आहे.

संबंधित बातम्या 

कोरोनाचा फटका, IPL पुढे ढकलण्याचा विचार : आरोग्य मंत्री राजेश टोपे

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.