वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?

विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत.

वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?
Follow us
| Updated on: Jul 15, 2019 | 5:40 PM

मुंबई : विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत. त्यानुसार विराट कोहलीच्या कर्णधारपदावर गदा येऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आता दोन कर्णधार करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार रोहित शर्माकडे वन डे आणि टी 20 चं कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. तर विराट कोहलीकडे केवळ कसोटी संघाचं कर्णधारपद ठेवलं जाऊ शकतं. आयएएनएस वृत्तसंस्थेला बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी बोर्ड त्याबाबत विचार करणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, “रोहित शर्माकडे वन डे संघाचं कर्णधारपद सोपवण्याची योग्य वेळ आहे. पुढील विश्वचषकाच्या तयारीसाठी योजना बनवायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी सध्याचे पर्याय नव्या पद्धतीने विचारात घ्यायला हवे. त्यानुसार रोहित शर्मा कर्णधारपदासाठी योग्य पर्याय आहे”

कोहली-रोहितमध्ये मतभेद?

दरम्यान विश्वचषकातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये मतभेद असल्याचा अफवाही पसरल्या. त्यामुळे आता प्रशासक समितीसोबत (COA) प्रशिक्षक रवी शास्त्री, विराट कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जातील.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, “तुम्हाला माहिती आहे की विनोद राय (COA प्रमुख) यांनी आधीच सांगितलं आहे की एक बैठक होईल, त्यामध्ये टीमच्या कामगिरीची समीक्षा होईल”.

संबंधित बातम्या 

आयसीसीच्या विश्वचषक संघात विराट कोहलीलाही स्थान नाही, फक्त दोन भारतीय नावं   

विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप 

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.