Asia Cup 2020 | आशिया चषकाचं आयोजन रद्द, गांगुलींची घोषणा, IPL बाबतही महत्त्वाची माहिती

'आयपीएल' भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते भारताच आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे गांगुली म्हणाले.

Asia Cup 2020 | आशिया चषकाचं आयोजन रद्द, गांगुलींची घोषणा, IPL बाबतही महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीच्या एक दिवस आधी ही घोषणा करण्यात आली. तर ‘आयपीएल 2020’ भारताच आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. (BCCI President Sourav Ganguly confirms Cancellation of Asia Cup 2020)

“भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका कधी असेल, हे इतक्यात सांगणे कठीण आहे. आम्ही तयारी केली आहे, पण सरकारच्या नियमांबद्दल काहीही करु शकत नाही. आम्हाला कोणतीही घाई नाही. खेळाडूंचे आरोग्य हे आमचे पहिले प्राधान्य आहे. आम्ही प्रत्येक महिन्याला परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत” असे सौरव गांगुली यांनी सांगितले.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

यावर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (पीसीबी) आशिया चषकाच्या यजमानपदाची जबाबदारी होती, परंतु भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयपीएलबाबत काय म्हणाले?

“आयपीएलबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत. ‘आयपीएल’ भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते भारताच आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. आम्ही 4 ते 5 ठिकाणी याचे आयोजन करण्याच्या विचारात आहोत. परंतु तसे झाले नाही, तर ते भारताबाहेर नेण्याचा मार्ग स्वीकारु. सर्व पर्याय आमच्यासाठी खुले आहेत” असे गांगुली म्हणाले.

हेही वाचा : 117 दिवसांनी क्रिकेटपटू मैदानात, ना प्रेक्षक, ना एकमेकांची गळाभेट, नवे नियम काय?

आयपीएल भारताबाहेर नेल्यास कोणत्या देशात नियोजन करणार? या प्रश्नावर उत्तर देताना गांगुली म्हणाले की “श्रीलंकेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. दुबईमध्येही परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु याविषयी अद्याप मंडळामध्ये चर्चा झालेली नाही.”

क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीग ‘आयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

(BCCI President Sourav Ganguly confirms Cancellation of Asia Cup 2020)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *