Virat Kohli : डॉक्टरांनी आत बोलवलं, त्यावेळेस टीम इंडिया काय करत होती? कोहली म्हणतो..

अनुष्कासोबत ज्यावेळी मी हॉस्पिटलला गेला त्यावेळी मी माझ्या मोबाईलवर वॉश्गिंटन सुंदर आणि शार्दूल ठाकूरची बॅटिंग पाहत होतो, असा खुलासा विराटने नुकताच केलाय. | Virat kohli

Virat Kohli : डॉक्टरांनी आत बोलवलं, त्यावेळेस टीम इंडिया काय करत होती? कोहली म्हणतो..
virat Kohli

नवी दिल्ली :  गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ‘पालक’ बनले होते. यासोबतच अनुष्काने त्यांच्या मुलीचे नावही जाहीर केले आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. ‘वामिका’ हे नावदेखील विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकारण करून बनवण्यात आले आहे. तत्पूर्वी अनुष्कासोबत ज्यावेळी मी हॉस्पिटलला गेला त्यावेळी मी माझ्या मोबाईलवर वॉश्गिंटन सुंदर आणि शार्दूल ठाकूरची बॅटिंग पाहत होतो, असा खुलासा त्याने नुकताच केलाय. (becoming Father Worderful moment in my Life Cant be Compared To missing Australia Tour Says Virat kohli)

विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकच कसोटी सामना खेळून मायदेशी परतला. पितृत्वाची रजा घेऊन अनुष्कासोबत राहणं त्याने पंत केलं. यावरुन त्याच्यावर बरीच टीका झाली. परंतु एका मुलीचा बाबा होणे आणि क्रिकेट खेळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बापमाणूस होणं हा माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सगळ्यात आनंदाचा क्षण होता, असं विराट म्हणाला.

वॉश्गिंटन सुंदर आणि शार्दूल ठाकूरची बॅटिंग इन्जॉय करत होतो….

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्याने बाबा बनण्याच्या सुंदर क्षणांना उजाळा दिला. यावेळी खास गोष्ट सांगताना ज्यावेळी मी अनुष्कासोबत दवाखान्यात गेलो होतो आणि आम्हाला डॉक्टरांनी आतमध्ये बोलावलं त्यावेळी मी माझ्या मोबाईलवर वॉश्गिंटन सुंदर आणि शार्दूल ठाकूरची बॅटिंग इन्जॉय करत होतो, असं विराट म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरोधात भारताचा पहिल्याच मॅचमध्ये धुव्वा उडाला. केवळ 36 धावांत ऑस्ट्रेलियाने भारताचा खुर्दा पाडला. पण यानंतर भारताने मालिकेत जे पुनरागमन केलं ते लाजवाब होतं. भारताच्या सर्व खेळाडूंनी जीव तोडून मेहनत करुन ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत जाऊन पराभूत करुन दाखवलं, असं विराट कोहली म्हणाला.

विराट-अनुष्काच्या मुलीचं बारसं…

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ‘पालक’ बनले होते. या दोघांनीही त्यांच्या मुलीला ‘पापराझीं’च्या नजरेपासून दूर ठेवले होते. मात्र, आता स्वतः विरुष्काने त्यांच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच अनुष्काने त्यांच्या मुलीचे नावही जाहीर केले आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे.

(becoming Father Worderful moment in my Life Cant be Compared To missing Australia Tour Says Virat kohli)

हे ही वाचा :

Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!

Published On - 9:41 am, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI