हॅप्पी बर्थ डे : क्रिकेटविश्व कवेत घेणारा पृथ्वी शॉ

विशाल बडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पृथ्वी शॉ… या 19 वर्षीय खेळाडूचं नाव जगात माहित नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. पृथ्वी शॉने शाळेतल्या क्रिकेटपासून ते भारतीय संघापर्यंत मजल मारत आपल्या यशाला आलेख चढताच ठेवला आहे. पृथ्वी शॉ आज 19 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 19 वर्षीय खेळाडूने अत्यंत कमी वयात मोठ्या विक्रमांना गवसणी […]

हॅप्पी बर्थ डे : क्रिकेटविश्व कवेत घेणारा पृथ्वी शॉ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

विशाल बडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पृथ्वी शॉ… या 19 वर्षीय खेळाडूचं नाव जगात माहित नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. पृथ्वी शॉने शाळेतल्या क्रिकेटपासून ते भारतीय संघापर्यंत मजल मारत आपल्या यशाला आलेख चढताच ठेवला आहे. पृथ्वी शॉ आज 19 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 19 वर्षीय खेळाडूने अत्यंत कमी वयात मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

पृथ्वीने राजकोट कसोटीत पदार्पणात शतक साजरं करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्याने 154 चेंडूंमध्ये 19 चौकारांच्या सहाय्याने 134 धावांची खेळी उभारली.

पृथ्वी शॉच्या गुणवत्तेची मुंबईकरांना पहिल्यांदा ओळख झाली ती 2013 सालच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत. या स्पर्धेत फ्रान्सिस डी अॅसिसीविरुद्धच्या सामन्यात त्याने 546 धावांची विश्वविक्रमी खेळी उभारली. ही खेळी केली तेव्हा पृथ्वी शॉ केवळ 14 वर्षांचा होता.

रणजी पदार्पणात शतक, दुलीप पदार्पणात शतक आणि आता कसोटी पदार्पणात शतक हे त्याच्या प्रगल्भतेचंच प्रतीक आहे. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पृथ्वीच्या नावावर आज सात खणखणीत शतकं आणि तीन अर्धशतकं आहेत. मुंबईतील या खऱ्या सोन्याने अल्पावधीतच मोठा टप्पा गाठला आहे. प्रत्येक ठिकाणी दमदार सुरुवात अशी ओळख मिळवलेल्या पृथ्वी शॉच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे.

पृथ्वी शॉच्या नावावर विक्रम

पहिल्या कसोटी मालिकेत मॅन ऑफ द सीरिजचा किताब पटकावणारा पृथ्वी भारताचा चौथा तर जगातील दहावा खेळाडू ठरला. दोन कसोटी सामन्यांमधल्या तीन डावांमध्ये मिळून 118.50 च्या सरासरीने 237 धावांचा रतीब घातला. पृथ्वीने राजकोट कसोटीत पदार्पणात 134 धावांची खेळी उभारली होती. हैदराबाद कसोटीत त्याने 70 आणि नाबाद 33 धावांच्या खेळी केल्या.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 18 वर्षीय पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली. पृथ्वीने पहिल्याच सामन्यात 134 धावा धावांची शतकी खेळी केली. याच खेळीच्या जोरावर पृथ्वी या सामन्यात सामनावीर ठरला. पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे.

याशिवाय 18 वर्ष 329 दिवसांचा पृथ्वी पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरलेला भारताचा तिसरा युवा खेळाडू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून सर्वात कमी वयात म्हणजे 17 व्या वर्षी सामनावीर ठरला होता.

अंडर-19 विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शच्या नावावर होता.

रणजी पदार्पणात शतक, दुलीप पदार्पणात

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच 546 धावा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.