मल्ल्यासोबतच्या फोटोमुळे ख्रिस गेल ट्रोल, अकाऊंटची माहिती न देण्याचाही सल्ला

भारतातील बँकांना कोट्यावधीचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्यासोबत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर नेटकऱ्यांनी ख्रिस गेलला चांगलंच ट्रोल केले आहे.

Chris Gayle and Vijay Mallya, मल्ल्यासोबतच्या फोटोमुळे ख्रिस गेल ट्रोल, अकाऊंटची माहिती न देण्याचाही सल्ला

नवी दिल्ली : भारतातील बँकांना कोट्यावधीचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्यासोबत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर नेटकऱ्यांनी ख्रिस गेलला चांगलंच ट्रोल केले आहे. या फोटोमध्ये गेलने मल्ल्याला बिग बॉस असा उल्लेख केला आहे.

फॉर्मुला वन ब्रिटिश ग्रॅण्ड प्रिक्स २०१९ ला आजपासून सुरुवात होत आहे. त्या दरम्यान काल ख्रिस गेल आणि विजय मल्ल्या यांची भेट झाली. यावेळचा एक फोटो गेलने ट्विटरवर शेअर केला. ‘बिग बॉस विजय मल्ल्याला भेटून खूप चांगलं वाटलं. रॉकस्टार… असे कॅप्शनही गेलने या फोटोला दिले.

यानंतर अनेकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. विजय मल्ल्याला बॉस म्हणणाऱ्या गेलला लाज वाटली पाहिजे, असं एका युजर्सने म्हटलं आहे. मल्ल्याला तुझ्या बँक अकाऊंटची माहिती देऊ नको असे काही जणांना म्हटले आहे. काहींनी तर त्याला कर्ज देऊ नका असेही सांगितले आहे. तर काहींना त्याला सांग आमचे पैसे परत कर अशीही मागणी केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *