AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Games 2022 Opening Ceremony : राष्ट्रकुलचा उद्घाटन सोहळा, पहिल्यात दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, कोणता सामना होणार, जाणून घ्या…

 Commonwealth Games 2022 Opening Ceremony : पाकिस्तान बॅडमिंटन महासंघाचा असा विश्वास होता की राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकू शकणार नाही. त्यामुळेच संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र,मध्यस्थीनंतर निवड करण्यात आली.

Commonwealth Games 2022 Opening Ceremony : राष्ट्रकुलचा उद्घाटन सोहळा, पहिल्यात दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, कोणता सामना होणार, जाणून घ्या...
भारत विरुद्ध पाकिस्तान Image Credit source: tv9
| Updated on: Jul 28, 2022 | 11:25 AM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) सहभागी होण्यासाठी 322 भारताचे सदस्य बर्मिंगहॅमला (Birmingham) पोहोचला आहे. आज 30 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत अलेक्झांडर स्टेडियमवर उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात ऑलिम्पिक बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू भारतीय दलाची ध्वजवाहक असणार आहे. भारतीय संघ (Indian Team) 29 जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. खेळांच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये आव्हाने देतील. या खेळांमध्ये पहिल्याच दिवशी चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे . भारत 29 जुलैला बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेतून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पहिल्याच सामन्यात त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा खूप हायव्होल्टेज असली तरी बॅडमिंटनमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. इथे भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान नगण्य आहे. पाकिस्तानला आपल्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा नाही आणि कदाचित त्यामुळेच या खेळांसाठी बॅडमिंटन संघ पाठवायला तयार नव्हते.

पाकिस्तानच्या संघात ताकद नाही

पाकिस्तान बॅडमिंटन महासंघाचा असा विश्वास होता की तो राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकू शकणार नाही. त्यामुळेच त्याने संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तान ऑलिम्पिक संघटनेच्या मध्यस्थीनंतर बर्मिंगहॅमला जाण्यासाठी चार सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. या संघाचे नेतृत्व माहूर शहजाद करेल, जो आपल्या देशातील एकमेव खेळाडू आहे जो क्रमवारीत अव्वल 175 मध्ये आहे. त्याच्याशिवाय संघाचे बाकीचे खेळाडू अव्वल 500 मध्येही नाहीत.

भारताने क्लीन स्वीप केला

भारतीय संघात एकेरी गटात पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांतसारखे खेळाडू आहेत. दुहेरी प्रकारात सात्विकसाईराज-चिराग ही जोडी अव्वल असेल. गायत्री आणि त्रिशा जॉली महिला दुहेरी गटात प्रवेश करणार आहेत. मिश्र श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर अनुभवी अश्विनी पोनप्पा सुमित रेड्डीसह कोर्टात उतरेल. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि भारताने पाकिस्तानचा 5-0 असा पराभव केला होता. तिसऱ्या सामन्यापर्यंत भारताने पाचपैकी एकही सामना जाऊ दिला नाही. यावरून भारताचे आव्हान किती खडतर असेल हे दिसून येते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामना कधी होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामना २९ जुलै रोजी होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामना किती वाजता सुरू होईल?

बॅडमिंटनचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरू होतील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामन्याचे थेट प्रक्षेपण मी कोठे पाहू शकतो?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी नेटवर्कच्या वाहिनीवर होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बॅडमिंटन सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर होणार आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.