
मेन्स टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी, बाद फेरी आणि फायनल अशा 3 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला. त्यानंतर वूमन्स टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला लोळवलं. अवघ्या काही दिवसांपूर्वी रॉबिन उथप्पा याच्या नेतृत्वात भारताने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत पाकिस्तानला धुळ चारली. आता इंडिया ए टीम पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या कुवेतची राजधानी दोहा इथे एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत हे 2 संघ भिडणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना रविवारी 16 नोव्हेंबरला होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना दोह्यातील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.
जितेश शर्मा या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करत आहे. तर इरफान खान याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. दोन्ही संघानी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने यूएईवर मात केली आहे. तर पाकिस्तानने ओमानला पराभूत केलंय. त्यामुळे आता दोन्ही संघांना सलग दुसरा सामना जिंकण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. वैभवने यूएई विरुद्ध आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात 144 धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभव पाकिस्तान विरुद्ध कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.