IND vs ENG: Rahul Dravid म्हणजे ‘नाम बडे, दर्शन छोटे’, टि्वटरवर वाईट पद्धतीने ट्रोल

IND vs ENG: भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर टि्वटरवर राहुल द्रविड यांना मोठ्या प्रमाणता ट्रोल केलं जातय. ते भारतीय संघाचे हेड कोच आहेत.

IND vs ENG: Rahul Dravid म्हणजे 'नाम बडे, दर्शन छोटे', टि्वटरवर वाईट पद्धतीने ट्रोल
rishabh pant rahul dravid
Image Credit source: AFP
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 05, 2022 | 5:04 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटीत (edgbaston test) इंग्लंडने भारताचा (IND vs ENG) दारुण पराभव केला आहे. मालिकेतील पाचवी अखेरची कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पहिल्या डावातील भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता, दुसऱ्याडावात ते इंग्लंडला विजयाच्या जवळपासही पोहोचू देणार नाही, असं वाटलं होतं. पण भारतीय संघाचा (Indian Team) दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडने सात विकेट राखून विजय मिळवला. दुसऱ्याडावात भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या फक्त तीन फलंदाजांना बाद करता आलं. भारतीय संघाची ही कामगिरी खरोखर चक्रावून टाकणारी आहे. चौथ्यादिवशी फलंदाज आणि गोलंदाज दोघेही फ्लॉप ठरले. त्याचा इंग्लंडने पुरेपूर फायदा उचलला. पहिले तीन दिवस या कसोटीवर भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं. पण शेवटच्या दोन दिवसात शरणागती पत्करली.

राहुल द्रविड ट्रोल

भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर टि्वटरवर राहुल द्रविड यांना मोठ्या प्रमाणता ट्रोल केलं जातय. ते भारतीय संघाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविड यांची संघाची रणनिती ठरवण्यात, संघ निवडण्यात महत्त्वाची भूमिका असते. मागच्या काही कसोटी सामन्यांपासून सुरु असलेला प्रकार इथेही पहायला मिळाला. दुसऱ्याडावात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्यांना इंग्लंडचे 10 विकेट काढणं शक्य झालं नाही. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत शेवटच्या दोन कसोटीत असच घडलं होतं. पहिल्या डावात भेदक वाटणारे भारतीय गोलंदाज दुसऱ्याडावात कमी पडतात.

‘नाम बडे, दर्शन छोटे’

टि्वटरवर राहुल द्रविड यांना भरपूर सुनावण्यात आलं आहे. “राहुल द्रविड यांनी आता हेड कोच पदावरुन निवृत्ती जाहीर करावी. इतक्या मोठ्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही योजना नाही” असं एका युजरने म्हटलं आहे.

राहुल द्रविड हे ‘नाम बडे, दर्शन छोटे’ याच एक उदहारण आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. भारताने वनडे, टी 20 वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर राहुल द्रविड सर्व आदर गमावून बसतील, असं एका युजरने म्हटलय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें