अजय जाडेजाचं मोठं विधान, भलेही कोहली कॅप्टन, मात्र रवी शास्त्रीच टीम चालवतात!

ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात टीम इंडियाचा (Team India) दृष्टीकोन बदलला आहे, त्याचं श्रेय रवी शास्त्री यांना जातं, असं जाडेजा म्हणाला.

अजय जाडेजाचं मोठं विधान, भलेही कोहली कॅप्टन, मात्र रवी शास्त्रीच टीम चालवतात!
Ravi Shastri_ Virat Kohli
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:28 PM

मुंबई : “टीम इंडियाचा कर्णधार भलेही विराट कोहली (Virat Kohli) आहे, मात्र टीम चालवण्याचं काम प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) करतात”, असं माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर अजय जाडेजाने म्हटलं आहे. ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात टीम इंडियाचा (Team India) दृष्टीकोन बदलला आहे, त्याचं श्रेय रवी शास्त्री यांना जातं, असं जाडेजा म्हणाला. अजय जाडेजा हा त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने रवी शास्त्रींसोबत क्रिकेट खेळलं आहे. (Ajay Jadeja said this is Virat Kohlis team but Ravi Shastri is the one running it)

जाडेजा म्हणाला, “सध्याची टीम ही विराट कोहलीची आहे. मात्र तिची बांधणी रवी शास्त्रींनी केली आहे. हा बदल आज-कालचा नाही, तर गेल्या 3-4 वर्षांपासून हे होत आलं आहे. जय-पराजय काही झालं तरी संघाचा दृष्टीकोन बदलत नाही. इथे संघव्यवस्थापनाचा विचार वेगळा आणि महत्त्वाचा आहे”

रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यापासून, आलेख चढता आहे. मात्र त्यांच्या नेतृत्त्वात भारताने अजून ICC चा एकही मानाचा किताब पटकावलेला नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने जगभरात दबदबा निर्माण केला आहे. शास्त्रींच्या नेतृत्त्वात भारताने 46 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 28 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. भारताच्या या यशाचा जसा कोहली भागीदार आहे, तसंच रवी शास्त्रींनाही यशस्वी प्रशिक्षक म्हणून पाहिलं जात आहे.

दुसरीकडे वन डेमध्ये भारताने 91 पैकी 57 सामन्यात विजय मिळवला आहे. भारताच्या विजयाची सरासरी तब्बल 62.64 टक्के इतकी आहे.

शास्त्रींच्या कोचिंगमुळे टीम इंडियाच्या विचारशैलीत बदल झाला आहे. संघातील खेळाडू काय विचार करतात, टीममध्ये असलेले आणि बाहेर असलेले खेळाडू कसा संदेश देतात, संघासाठी कशाप्रकारचा पर्याय तयार करायचा आहे, हे सर्व शास्त्रींच्या कोचिंगमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळेच टीम सातत्याने दमदार कामगिरी करत आहे, असं अजय जाडेजा म्हणाला.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.