Ajinkya Rahane : ऋषभ पंतनंतर आता रहाणेही करणार कॅप्टन्सी, अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणार इंडियाचे खेळाडू
Ajinkya Rahane Mumbai Captain : अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच रोहित शर्मा आणि हार्दिक तामोरे हे रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याची आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंत केएल राहुल याची जागा घेणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियापासून बाहेर असलेला फलंदाज माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याची पुन्हा एकदा मुंबईच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे गेल्या काही स्पर्धेसाठी संघात होता. मात्र श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता रहाणे पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहे.
एमसीएच्या निवड समितीने 20 जानेवारीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील एका सामन्यासाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यानुसार रहाणे मुंबईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. मुंबईचा 23 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे.
मुंबईच्या संघात एकूण रहाणेसह एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकुर हे 5 खेळाडू आता रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहेत.
रोहितचं रणजी क्रिकेटकमध्ये कमबॅक
दरम्यान रोहित शर्मा 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रोहित मैदानात उतरताच इतिहास रचणार आहे. रोहित शर्मा मैदानात उतरताच 17 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत खेळणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल. याआधी सौरव गांगुली 17 वर्षांपूर्वी कर्णधार असताना रणजी क्रिकेट खेळला होता.
अशी आहे मुंबई टीम
🚨 𝑱𝑼𝑺𝑻 𝑰𝑵 🚨
Mumbai has announced their squad for the next round of the Ranji Trophy against Jammu & Kashmir! ⚪💪
Rohit Sharma makes his return to the tournament after 10 long years, with some key players added to the side 🔥#AjinkyaRahane #Mumbai #RanjiTrophy… pic.twitter.com/r0aWaa4yqw
— Sportskeeda (@Sportskeeda) January 20, 2025
जम्मू काश्मिर विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.