आशिया कप असो की आणखी कोणता सामना..! IND vs PAK सामन्यापूर्वी अष्टपैलू दीप्ति शर्माचं मोठं विधान
वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापूर्वी प्रचंड उत्सुकता वाढली आहे. असं असताना अष्टपैलू दीप्ति शर्माचं विधान चर्चेत आलं आहे. नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊयात..

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. भारतीय महिसा क्रिकेट संघाची पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त कामगिरी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 17 टी20 सामने झाले असून पाकिस्तानने फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानने भारताला शेवटचं ऑक्टोबर 2022 आशिया कप स्पर्धेत पराभूत केलं होतं. या दोन्ही संघामध्ये शेवटचा सामना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत झाला होता. या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. त्यामुळे भारताचं पारडं जड मानलं जात आहे. असं असताना अष्टपैलू दीप्ति शर्माने या सामन्यापूर्वी मोठं विधान केलं आहे. दीप्तिने सांगितलं की, टीम इंडिया प्रतिस्पर्धी संगाच्या एक पाऊल पुढे आहे. इतकंच काय तर आपल्या रणनितीवर टिकून आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी आहे.
काय म्हणाली दीप्ति शर्मा?
दीप्ति शर्मा पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला की, “बघा, असा कोणताही फायदा किंवा दबाव नव्हता. गोष्ट फक्त एवढीच आहे की, आम्ही त्यांच्याविरुद्ध जिंकलेल्या प्रत्येक सामन्यात, मग तो आशिया कप असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा, आम्ही नेहमीच त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहिलो आहोत. हेच मुख्य कारण आहे.” दीप्ति शर्मा पुढे म्हणाली की, संपूर्ण भारतीय यावेळी चांगली कामगिरी करत आहे. फलंदाजी असो की गोलंदाजी दोन्ही भागात भारतीय संघ मजबूत आहे. सामन्याच्या दिवशी चांगली कामगिरी करणारा खेळाडू सामना पुढे नेते. त्या खेळाडूला इतर खेळाडू पाठिंबा देतात.
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याबाबत म्हणाली की, आमचा संघ चांगला आहे आणि त्यांचे गोलंदाज चांगले आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण मी आधी म्हंटलं तसं की आम्हाला फक्त चांगलं आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळायचं आहे. आमचं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रीत आहे. चांगलं क्रिकेट खेळणं हे आमचे एकमेव ध्येय आहे. फलंदाजी असो की गोलंदाजी आणि एक संघ म्हणून एकजुटीने सामना करून. संपूर्ण संघाला गेल्या दोन सामन्यांप्रमाणे एकजुटीने खेळावं लागेल.
