AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA : रोहित-विराट सारख्या मोठ्या प्लेयरची विकेट काढूनही सौरभ नेत्रवाळकर स्वत:ला का दोष देतोय?

IND vs USA : मूळचा मुंबईकर असलेला सौरभ नेत्रवाळकर आज अमेरिकेसाठी मोठा स्टार बनलाय. भारत-पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्याने दमदार गोलंदाजी केली. काल रोहित शर्मा-विराट कोहली सारख्या दिग्गज फलंदाजांना त्याने तंबुची वाट दाखवली.

IND vs USA : रोहित-विराट सारख्या मोठ्या प्लेयरची विकेट काढूनही सौरभ नेत्रवाळकर स्वत:ला का दोष देतोय?
saurabh netravalkarImage Credit source: PTI
| Updated on: Jun 13, 2024 | 2:11 PM
Share

T20 वर्ल्ड कप 2024 टुर्नामेंटमध्ये भारत-अमेरिकेत काल न्यू यॉर्कमध्ये रोमांचक सामना झाला. या मॅचमध्ये भारताने 10 चेंडू आणि 7 विकेट राखून अमेरिकेवर विजय मिळवला. त्याचबरोबर टीम इंडियाने सुपर-8 मध्ये सुद्धा क्वालिफाय केलय. अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी केवळ 111 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. सोप लक्ष्य असूनही टीम इंडिया सहजतेने लक्ष्यापर्यंत पोहोचली नाही. अमेरिकी गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मूळचा मुंबईकर असलेल्या अमेरिकेच्या सौरभ नेत्रवाळकरने विराट कोहलीच्या रुपाने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. विराटला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर रोहित शर्माला 3 धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. सौरभने टीम इंडियाला अडचणीत आणलं होतं. मात्र, तरीही सौरभ नेत्रवाळकर स्वत:ला दोष देत होता.

सौरभ नेत्रवाळकरने भारता विरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्यामुळे टीम इंडिया दबावात आली. 8 व्या षटकात ऋषभ पंतच्या रुपाने टीम इंडियाचा तिसरा विकेट गेला. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना एक-एक रन्स जमवण्यासाठी मेहनत करावी लागली. त्यानंतर आवश्यक धावगती हळू-हळू वाढू लागली. 12.3 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 58 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार यादव 22 रन्स करुन क्रीजवर होता.

सूर्या-नेत्रवाळकर कधी एकत्र खेळलेत

सुर्याने आवश्यक धावगती वाढवण्यासाठी 13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाऊंड्री मारण्याचा प्रयत्न केला. त्याने नेत्रवाळकरकडे झेल दिला. पण त्याच्या हातातून ही महत्त्वाची कॅच सुटली. त्यानंतर सूर्या खूपच सावध झाला. सामन्यानंतर नेत्रवाळकरने ही कॅच सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली. महत्त्वाच म्हणजे सौरभ नेत्रवाळकर आणि सूर्यकुमार यादव अंडर-15 मध्ये एकत्र खेळले आहेत. त्याने या सगळ्याची जबाबदारी घेतली. सूर्याची कॅच पकडली असती, तर भारतावर दबाव वाढला असता असं नेत्रवाळकर म्हणाला.

अमेरिकेचा आज मोठा स्टार

कधी काळी टीम इंडियाकडून खेळण्याच स्वप्न पाहणारा सौरभ नेत्रवाळकर आता अमेरिकन क्रिकेट टीमसाठी मोठा स्टार बनलाय. अंडर-19 मध्ये तो भारताकडून खेळलाय. आता T20 मध्ये तो अमेरिकेसाठी जबरदस्त कामगिरी करतोय. कॅनडा विरुद्ध त्याला एकही विकेट मिळाला नव्हता. पण पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेच्या पहिल्या मोठ्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.