Anaya Bangar: ‘आम्ही एकत्र…’, बांगरच्या मुलीने क्रिकेटपटू सरफराज खानसोबत फोटो शेअर करत उडवली खळबळ
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने एखादी पोस्ट करताच त्याबाबत चर्चांचे फड रंगतात. आता तिने क्रिकेटपटू सरफराज खानसोबत एक फोटो शेअर केला आहे. तसेच पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी अनाया बांगरच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आता केलेल्या पोस्टमध्ये तिने क्रिकेटपटू सरफराज खान आणि त्याच्या वडिलांची भेट घेतल्याचं दिसत आहे. अनाया आणि सरफराज लहानपणापासून मित्र आहेत. अनाया लिंग परिवर्तन करण्यापूर्वी मुलगा होती. तिचं नाव आर्यन बांगर होतं. पण हार्मोन इश्यूमुळे त्याने लिंग बदल केला आणि आता मुलगी झाली आहे. असं असूनही अनाया आणि सरफराजच्या मैत्रीवर काहीच परिणाम झाला नाही. अनायाने इन्स्टाग्रामवर माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीसोबत घरातील आणि बाहेरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अनाया, सरफराज एकत्र थारच्या छतावर बसल्याचं दिसतं आहे. तर सरफराजचे वडील गाडी चालवताना दिसत आहेत. अनाया बांगरने आपल्या पोस्टला कॅप्शन देताना लिहिलं की, ‘आम्ही फोन घेण्यापूर्वी बॅट धरायचो. सुरुवातीपासूनचे मित्र.’
सरफराज खानची भेट घेतल्यानंतर अनायाने फोटो कॅप्शनमध्ये मुशीर खानला मिस केल्याचं सांगितलं. मुशीर खान आयपीएल 2025 स्पर्धेत खेळत आहे. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. अनाया नुकतीच इंग्लंडमधून मुलगी होऊन परतली आहे. तिने आपला लूकही बदलला आहे. तसेच कर्ली केसांना स्ट्रेट केलं आहे. अनायाने अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात अनाया लिंग बदलानंतर खूपच खूश असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, एका व्हिडीओत सरफराजने खुलासा केली की, आज दोन आनंदाचे क्षण आहेत. एक थार गाडीला एक वर्ष झालं असून मॉडिफाय केली आहे. यावर माझा जर्सी नंबर 97 लिहिला आहे. दुसरं म्हणजे आमच्या घरी अनाया बांगर आली आहे. मला वाटतं की आम्ही दोन-तीन वर्षांनंतर भेटलो आणि यासाठी आजचा दिवस खास आहे.
View this post on Instagram
यापूर्वी अनाया बांगरने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बरेच खुलासे करत सांगितलं होतं की, ‘मी आठ नऊ वर्षांची असताना माझ्या आईच्या कपाटातून कपडे निवडून ते घालायची. मग आराशात बघून म्हणायचे की मी एक मुलगी आहे. मला मुलगीच व्हायचं आहे.’ त्यानंतर अनायाने क्रिकेटविश्वाबाबतही मत व्यक्त केलं होतं. ‘मी मुशीर खान, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल यांच्यासारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे. वडील प्रसिद्ध व्यक्ती असल्याने मला स्वत:बाबत गोपनीयता राखावी लागली. क्रिकेटचे जग असुरक्षितता आणि विषारी पुरुषत्वाने भरलेले आहे.’, असंही तिने पुढे सांगितलं होतं.