AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: Arshdeep singh ने दाखवली स्विंगची जादू, झिम्बाब्वेच्या बॅट्समनने बॅट फिरवली आणि….पहा VIDEO

IND vs ZIM: टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह या वर्ल्ड कपमध्ये कमालीच प्रदर्शन करतोय. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी खेळणं फलंदाजांना जमत नाहीय.

IND vs ZIM: Arshdeep singh ने दाखवली स्विंगची जादू, झिम्बाब्वेच्या बॅट्समनने बॅट फिरवली आणि....पहा VIDEO
ICCImage Credit source: icc
| Updated on: Nov 06, 2022 | 6:48 PM
Share

मेलबर्न: टीम इंडिया दिमाखात T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. आज मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाकडून आज बॅट्समन आणि बॉलर दोघांनी कमालीच प्रदर्शन केलं. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह या वर्ल्ड कपमध्ये कमालीच प्रदर्शन करतोय. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी खेळणं फलंदाजांना जमत नाहीय.

एक सुंदर स्विंग चेंडू टाकला

झिम्बाब्वे विरुद्धच्या आजच्या मॅचमध्ये हे दिसून आलं. त्याचा आज हवेत स्विंग झालेला चेंडू बॅट्समनला कळलाच नाही. झिम्बाब्वेच्या इनिंगमध्ये अर्शदीपने एक सुंदर स्विंग चेंडू टाकला. त्याने झिम्बाब्वेचा फलंदाज रेजिस चकबवाला क्लीन बोल्ड केलं.

पण चेंडू त्याला समजलाच नाही

रेजिस चकबवा अर्शदीपच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याला समजलाच नाही. बॅट हवेत असताना चेंडूने स्टम्पस उडवले होते. चकबवा आपलं खातही उघडू शकला नाही.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

टीम इंडियाने झिम्बाब्वेला दबावाखाली ठेवलं

आजच्या मॅचमध्ये सुरुवातीपासून टीम इंडियाने झिम्बाब्वेला धक्के दिले. त्यांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने 35 आणि सिकंदर रझाने 34 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेला धक्का दिला. भारताकडून हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2, रविचंद्रन अश्विनने 3, आणि भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षरने प्रत्येकी 1 विकेट घेतला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 5 बाद 186 धावा केल्या. झिम्बाब्वेची टीम 115 धावांवर ऑलआऊट झाली.

ग्रुपमध्ये टीम इंडिया टॉपवर

टीम इंडियाने सुपर 12 राऊंडमध्ये फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. पाकिस्तान, नेदरलँड्स, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच जिंकून ग्रुपमध्ये 8 पॉइंटससह टॉपवर राहिले.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.