AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला

Punjab Kings vs Lucknow Super Giants: पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 54 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर संघ मालकिन प्रीति जिंटा मैदानात उतरला आणि खेळाडूंचं कौतुक केलं. यानंतर तिने अर्शदीप सिंगला मिठी मारली.

Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला
Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिलाImage Credit source: X And Video Grab
| Updated on: Apr 20, 2026 | 4:48 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सची विजयी घोडदौड कायम आहे. पंजाब किंग्सने सहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला 54 धावांनी पराभूत केलं आणि गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करातना 20 षटकात 254 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघ 200 धावा करू शकला. या विजयानंतर पंजाब किंग्सच्या खात्यात आणखी 2 गुणांची भर पडली. 11 गुणांसह पंजाब किंग्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. या विजयानंतर पंजाब किंग्सची सहमालकिन आणि बॉलिवूड अभिनेत्र प्रीति जिंटा हीने मैदानात हजेरी लावली. यावेळी तिने संघ सहकाऱ्यांचं कौतुक केलं. विजयानंतर तिने सर्व खेळाडूंची भेट घेतली.यावेळी लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडूही उपस्थित होते. पण तिने अर्शदीप सिंगला पाहिलं आणि त्याला थेट मिठी मारली. त्यानंतर अर्शदीप सिंगची प्रतिक्रिया भन्नाट होती. ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सच्या विजयानंतर प्रीति जिंटा हिने कौतुक करत अर्शदीप सिंगची गळाभेट घेतली. यावेळी अर्शदीप सिंग आनंदी झाला आणि त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्याचं दिसून आलं. प्रीति जिंटाचे लाखो चाहते आहेत. अर्शदीप सिंगही त्या चाहत्यांपैकी एक आहे. त्यामुळे प्रीति झिंटाने गळाभेट घेताच अर्शदीप सिंग खूश झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहम्मद शमी हा प्रकार घडला तेव्हा तिथे उपस्थित होता. अर्शदीप सिंगचं वागणं पाहून त्यालाही हसू आलं. तर प्रीति जिंटाही हसत होती. सोशल मीडियावर युजर्सनी हा व्हिडीओ पसंत केला असून त्याखाली प्रतिक्रिया नोंदवरत आहे.

अर्शदीप सिंग पुन्हा एकदा फॉर्मात परतल्याचं दिसत आहे. गुजरात टायटन्सस, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2, मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 1 विकेट काढली. अर्शदीप सिंग फॉर्मात आल्याने पंजाब किंग्सच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आता पंजाब किंग्सला या स्पर्धेत 8 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळाला की प्लेऑफमधील जागा पक्की होणार आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच