AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पहिल्या सामन्यातच इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाला फटका, आयसीसीने केलं असं की…

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी अ‍ॅशेस मालिकेने सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्याचा निकाल लागला असला तरी दोन्ही संघांना मोठी किंमत मोजावी लागली आहे.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पहिल्या सामन्यातच इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाला फटका, आयसीसीने केलं असं की...
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला आयसीसीचा दणका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये बसणार मोठा फटकाImage Credit source: ICC
| Updated on: Jun 21, 2023 | 3:31 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अ‍ॅशेस मालिका सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2 गडी आणि 27 चेंडू राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल आहे. मात्र असं असताना दोन्ही संघांना आयसीसीने जोरदार दणका दिला आहे. आयसीसीच्या कारवाईमुळे दोन्ही संघांना सरतेशेवटी किंमत मोजावी लागू शकते. थोड्याशा फरकाने अंतिम फेरीतील स्थान गमवावं लागू शकतं. पहिल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. दोन्ही संघांना दोन गुणांचा फटका बसला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून सामना जिंकणाऱ्या संघाला 12 आणि पराभूत झालेल्या संघाला 0 गुण दिले जातात. मात्र आयसीसीने केलेल्या कारवाईमुळे ऑस्ट्रेलियाला जिंकूनही 10 गुण, तर इंग्लंडने सामना गमवल्याने पदरात -2 गुणांची भर पडली आहे.

दुसरीकडे, स्लो ओव्हर रेटमुळे खेळाडूंच्या सामना मानधनातून 40 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सांगितलं की, दोन्ही संघांनी ठरलेल्या वेळेनुसार दोन षटकं कमी टाकली आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी गुन्हा मान्य केला आहे.

आयसीसीने स्लो ओव्हररेटसाठी कठोर नियम केले आहेत. कारण षटकं टाकण्यास विलंब केला की खेळाचा खोळंबा होतो. तसेच इतर गणितं चुकतात. त्यामुळे स्लो ओव्हर रेट टाळण्यासाठी आयसीसीची कडक नियमावली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने 8 गडी गमवून 393 धावा केल्या आणि डाव घोषित केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 386 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 273 धावांवर सर्वबाद झाला आणि 280 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून पूर्ण केलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.