Asic Cup मध्ये धोनीच्या भिडूची चमकदार कामगिरी, 20 वर्षाच्या पोराने रचला इतिहास

Asia Cup 2023 : आशिया कपमधील श्रीलंकेविरूद्ध बांगलादेशचा डाव 164 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून 20 वर्षाच्या पोराने झकास अशी गोलंदाजी करत 4 विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीसह त्याने 29 वर्षांचा रेकॉर्ड मोडत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Asic Cup मध्ये धोनीच्या भिडूची चमकदार कामगिरी, 20 वर्षाच्या पोराने रचला इतिहास
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 7:34 PM

मुंबई : आशिया कप 2023 मधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये सुरू आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरलाय, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव 164 गावांमध्ये आटोपला आहे. श्रीलंकेला आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी हे आव्हान पार करायचं आहे. बांगलादेशच्या डावाला खऱ्या अर्थाने श्रीलंकेच्या एका पठ्ठ्याने सुरूंग लावला.

‘हा’ खेळाडू आहे धोनीचा खास भिडू!

आयपीएलमध्ये धोनीच्या खास खेळाडूंपैकी एक असलेला म्हणजे पाथिराना.आयपीएलमध्ये पाथिरानाने अनेक सामने आपल्या एकट्याच्या जोरावर सीएसकेला जिंकून दिलेले आहेत. धोनीच्या तालमीत तयार झालेला पट्ट्या श्रीलंकेसाठी आता चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी बांगलादेशच्या चार विकेट घेत संघासाठी मोलाची कामगिरी केली.

पाथिराना याने कर्णधार शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना आऊट केलं.  त्यासोबतच महेश तीक्ष्णाने 2 विकेट घेत आणि ऑल आऊट करण्यात मोलाची कामगिरी केली.  मथिशा पाथिरानाने 4 बळी घेत या झकास कामगिरीसह त्याने विक्रम नावावर केलाय. वन डे फॉरमॅटमध्ये 4 विकेट घेणारा तो श्रीलंकेचा सर्वात तरूण बॉलर ठरला आहे.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश तीक्ष्णा, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना,

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.