Asia Cup 2023 साठी टीम इंडियात या बॅट्समनची एन्ट्री, पाकिस्तान विरुद्ध संधी मिळणार!
Asia Cup 2023 Team India | टीम इंडिया सुपर 4 मधील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या महामुकाबल्याआधी टीम इंडियात आणखी एक खेळाडू जोडला गेला आहे.

कोलंबो | टीम इंडियाने नेपाळवर 4 सप्टेंबरला आशिया कप 2023 स्पर्धेत 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजायसह सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं. नेपाळने टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 231 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियाला डीएलएसनुसार 23 ओव्हरमध्ये 145 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. टीम इंडियाचाया सुपर 4 मध्ये पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
पाकिस्ता विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 10 सप्टेंबरला महामुकाबला पार पडणार आहे.सुपर 4 मधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन टीम इंडियात सहभागी झाला आहे. हा खेळाडू श्रीलंकेत पोहचला आहे. हा खेळाडू विकेटकीपिंग आणि बॅटिंगसह ओपनिंगही करतो. त्यामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. तो खेळाडू कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा श्रीलंकेत दाखल झाला आहे. दुखापतीनंतर केएलची आशिया कपसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली. मात्र केएल राहुल पूर्णपणे खेळण्यासाठी सक्षम नसल्याने तो खेळणार नसल्याची माहिती हेड कोच राहुल द्रविड यांनी दिली होती. त्यामुळेच केएल हा पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे टीममध्ये ईशान किशन याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला होता.
केएल राहुल श्रीलंकेत दाखल
KL Rahul has reached Sri Lanka for the Asia Cup.
Great news for India. pic.twitter.com/yCsyh1nLlp
— Johns. (@CricCrazyJohns) September 5, 2023
पाकिस्तान विरुद्ध संधी!
आता केएल श्रीलंकेत पोहचला आहे. त्यामुळे केएलची टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होऊ शकते. केएलला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. केएलला संधी मिळाल्यास ईशान किशन याला बाहेर बसावं लागू शकतं. टीम इंडिया 10 सप्टेंबरला सुपर 4 मधील आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट केएलला संधी देणार की नाही, यासाठी आणखी 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या वर्ल्ड कप टीममध्ये केएलचा विकेटकीपर म्हणून समावेश केला आहे. रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या हा उपकर्णधार असणार आहे.
