
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. साखळी फेरीनंतर दोन्ही संघांची या स्पर्धत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.जाणून घ्या.
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती या दोघांचं कमबॅक झालं आहे.या दोघांच्या जागी ओमान विरूद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना संधी दिली होती. मात्र सुपर 4 मधील सामन्यासाठी पुन्हा एकदा बुमराह आणि वरुणचं कमबॅक झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननेही 2 बदल केले आहेत.
पाकिस्तानने हसन नवाझ आणि खुशदील शाह या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. तर या दोघांच्या जागी हुसैन तलत आणि फहीम अश्रफ यांना संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांची टी 20i क्रिकेटमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आमनेसामने येण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी उभयसंघात 4 सामने झाले आहेत. दोन्ही संघांनी या मैदानात प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर 4 मधील सामना जिंकून कोणता संघ दुबईत 3-2 ने आघाडी घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
कॅप्टन सूर्याकडून हस्तांदोलन नाहीच
During Ind vs Pak Toss video watch now #INDvsPAK #BoycottINDvPAK #IndiaPakistanMatch #Toss #BCCIShameShame pic.twitter.com/KESojiSFul
— A2Z Update (@Sachinshukla556) September 15, 2025
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : सॅम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.