Asia Cup 2025 : उद्या भारत पाकिस्तान हाय होल्टेज सामना, कोण बाजी मारणार? ज्योतिषांचं धक्कादायक भाकीत
आशिया कप 2025 मधला सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याबाबत आता ज्योतिषांचं भाकीत समोर आलं आहे.

आशिया कप 2025 मधला सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही सामना असो, त्याकडे अवघ्या जगाचं लक्ष असतं. जगभरातील कोट्यवधी क्रिकेट फॅन्स या सामन्याचा आनंद घेतात. दोन्ही देशांमध्ये काटे की टक्कर असते, जे क्रिकेट पाहात नाही, किंवा ज्यांना क्रिकेट फार आवडत नाही, ते लोक देखील हा सामना पाहातात. दरम्यान उद्या होणाऱ्या या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड आहे? कोणत्या संघाला नशीबाची साथ मिळणार आहे? कोणता संघ विजयी होऊ शकतो? याबाबत आता मोठी भविष्यवाणी समोर आली आहे, जाणून घेऊयात ज्योतिषांनी नेमका काय दावा केला आहे? त्याबद्दल.
ज्योतिषांनी केलेल्या दाव्यानुसार प्रत्येकवेळी टीम इंडिया विजयी होण्यामध्ये गुरु ग्रहाची विशेष भूमिका असते, मात्र यावेळी गुरुची दशा ही अतिक्रमणाच्या स्थितीत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ही ग्रहदशा शुभ मानली जात नाही. गुरु यावेळी बुध ग्रहच्या राशीत मिथुनमध्ये आहे, तसेच तो पुनर्वसू नक्षत्रात गोचर करत आहे. जेव्हा भारतानं 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा गुरु हा मंगळ ग्रहाच्या राशीमध्ये विराजमान होता. मात्र यावेळी गुरु हा बुधाच्या राशीमध्ये आहे. गुरुसोबतच शनिचं स्थान देखील महत्त्वाचं आहे, शनि यावेळी गुरु ग्रहाची राशी मीनमध्ये विराजमान आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार खेळामध्ये ग्रहांचा सेनापती मंगळांचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं, कारण खेळाडूंचा संबंध हा मंगळ ग्रहाशी मानला जातो. कारण मंगळ हा ग्रह, ऊर्जा, ताकत, धैर्य, युद्ध आणि पराक्रम याचा प्रतिक ग्रह आहे. 13 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाने शुक्राची राशी असलेल्या तुळ राशीत प्रवेश केला आहे, तसेच तो चित्रा नक्षत्रात गोचर करत आहे, तर दुसरीकडे शनि वक्री अवस्थेत असून ते उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचर करत आहे, अशा अवस्थेमध्ये भारत हा सामना जिंकू शकतो असा ज्योतिषांचा अंदाज आहे.
ज्योतिषांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्याचा सामना भारत जिंकेल परंतु हा सामना सहज जिंकता येणार नाही, त्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल, सुरुवातीला भारताची स्थिती मजबूत असेल मात्र त्यानंतर मधल्या काळात पाकिस्तानचं जोरदार पुनरागमन होईल, त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये हा सामाना भारताच्या बाजूनं झुकेल असं भाकीत या सामन्याबाबत वर्तवण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
