AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup Rising Stars 2025 : 8 संघ-15 सामने, शुक्रवारपासून आशिया कप स्पर्धा, या तारखेला भारत-पाक सामना, पाहा वेळापत्रक

Asia Cup Rising Stars 2025 Live and Digital Streaming : एसीसी मेन्स टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा अ संघ जितेश शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. या स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Asia Cup Rising Stars 2025 : 8 संघ-15 सामने, शुक्रवारपासून आशिया कप स्पर्धा, या तारखेला भारत-पाक सामना, पाहा वेळापत्रक
India vs Pakistan Cricket FansImage Credit source: AFP Photo
| Updated on: Nov 14, 2025 | 1:09 AM
Share

भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सप्टेंबर महिन्यात आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसर्‍यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर आता 14 नोव्हेंबरपासून एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या 8 संघात एकूण 15 टी 20 सामने होणार आहेत. स्पर्धेतील अंतिम सामना हा 23 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील 8 संघांना ए आणि बी अशा 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार रंगेल आणि विजेता निश्चित होईल.

स्पर्धेतील सहभाग घेतलेल्या एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत 8 पैकी 3 प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये ओमान, हाँगकाँग आणि यूएईचा समावेश आहे. तर इतर 5 संघांची ए टीम स्पर्धेत खेळणार आहे. या 5 संघांमध्ये भारत ए, पाकिस्तान ए, श्रीलंका ए, बांगलादेश ए आणि अफगाणिस्तान ए चा समावेश आहे.

कोणता संघ कोणत्या गटात?

ए ग्रुपमध्ये हाँगकाँग, बांगलादेश ए, अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए टीम आहेत.

बी ग्रुपमध्ये ओमान, यूएई, पाकिस्तान ए आणि भारत ए संघ आहेत.

आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेतील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?

आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.

आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेतील लाईव्ह सामने मोबाईलवर कोणत्या एपवर पाहायला मिळतील?

आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेतील लाईव्ह सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळतील.

दररोज 2 सामने

आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेत सलग 6 दिवस दररोज डबल हेडरचा थरार रंगणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेत रोज 2 सामने होतील.

रविवारी महामुकाबला, भारत-पाक सामना

या स्पर्धेत येत्या रविवारी अर्थात 16 नोव्हेंबरला होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या सामन्यात 2 कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेत जितेश शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.