BCCI Big Update : टीम इंडियासाठी वाईट बातमी, आशिया चषकापूर्वी गोलंदाज जखमी, खेळणार की नाही? संभ्रम कायम

आज फ्लोरिडा येथे चौथा T20 सामना सुरू होताच बीसीसीआयनं हर्षस पटेलच्या दुखापतीबाबत अपडेट जारी केलंय. बरगडीच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्यानं पटेल दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही.

BCCI Big Update : टीम इंडियासाठी वाईट बातमी, आशिया चषकापूर्वी गोलंदाज जखमी, खेळणार की नाही? संभ्रम कायम
आशिया चषकापूर्वी गोलंदाज जखमीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 9:51 PM

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 (Asia World Cup 2022) सुरू होण्यासाठी फक्त 3 आठवडे शिल्लक आहेत. त्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची (Team India)  घोषणा अद्याप झालेली नाही. संघ निवडीबाबत आधीच अनेक प्रश्न आहेत, त्यातील काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतही आहेत. अलीकडच्या काळात टीम इंडियासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलच्या दुखापतीने नवी डोकेदुखी वाढवली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघासोबत असलेला हर्षल टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज फ्लोरिडा येथे चौथा T20 सामना सुरू होताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हर्षस पटेलच्या दुखापतीबाबत नवीन अपडेट जारी केलंय. बोर्डाने (BCCI) दुसऱ्या सामन्यादरम्यानच सांगितले होते की, तो बरगडीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, त्यामुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही.

बीसीसीआयचं ट्विट

बीसीसीआयनं काय म्हटलंय?

आता बीसीसीआयने सांगितले आहे की हर्षल पटेल या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘हर्षल पटेल त्याच्या बरगडीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन्ही टी-20 सामन्यांना वगळण्यात आले आहे.’

T20 मालिकेत एकही सामना खेळला नाही

हर्षल पटेल हा वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणार्‍या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाचा एक भाग आहे. परंतु दुखापतीमुळे तो एकाही सामन्यात संघाचा भाग होऊ शकला नाही. हर्षल पटेल दुखापतीमुळे 2022 च्या टी-20 विश्वचषकातूनही बाहेर जाऊ शकतो. अमेरिकेतून परतल्यावर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सामील होण्यास सांगितले जाईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या हर्षलने आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले आहेत, तर 10 जुलैपासून तो एकही सामना खेळलेला नाही.

आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल या टीम इंडियाचा भाग असणार नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यात हर्षल पटेलला दुखापत झाली होती. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून सांगितले होते की, स्टार गोलंदाज हर्षल पटेल दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध नाही, मात्र आता त्याची दुखापत गंभीर असून तो दीर्घकाळ बाहेर असू शकतो.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.