AUS vs BAN Live Streaming: बांगलादेशसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सामना केव्हा?
Australia vs Bangladesh Super 8 T20 World Cup 2024 Live Match Score: साखळी फेरीत धमाका केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश सुपर 8 मधील पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील एकूण 44 व्या सुपर 8 फेरीत ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील पहिलाच सामना असणार आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर नजमुल हुसैन शांतो बांगलादेशीची सूत्रं सांभाळणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले. तर बांग्लादेशला 3 सामने जिंकण्यात यश आलं. आता दोन्ही संघ सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाले आहेत. हा सामना कधी, कुठे? होणार हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना शुक्रवारी 21 जून रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना सर व्हीव्हीयन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, एटिंग्वा येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, ॲश्टन आगर, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड.
बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटॉन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, शकीब अल हसन, तॉहिद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, तन्झिम हसन साकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.
