
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रविवार 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा पर्थमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मिचेल मार्श या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याची एकदिवसीय कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. कॅप्टन शुबमन पुन्हा एकदा दुर्देवी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला.
कॅप्टन मिचेल मार्श याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 50 ओव्हरमध्ये किती धावा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचा हा 223 दिवसांनंतर पहिलाच एकदिवसीय सामना आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनिमित्ताने 9 मार्च 2025 रोजी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर टीम इंडिया थेट आता एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.
रोहित शर्माचा हा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना आहे. रोहित 500 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा टीम इंडियाचा दुसरा सक्रीय फलंदाज ठरला आहे. रोहितआधी विराट कोहली याने 500 सामन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे.
टीम मॅनेजमेंटने युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली आहे. रोहित शर्माने नितीशला ओडीआय कॅप देत टीम इंडियात स्वागत केलं. तसेच यावेळेस इतर सहकाऱ्यांनी नितीशला शुभेच्छा दिल्या. नितीशने बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी निर्णायक स्थितीत शतक केलं होतं. त्यामुळे आता नितीश पदार्पणातील सामन्यात कशी कामगिरी करतो? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first in the 1st #AUSvIND ODI.
Updates ▶️ https://t.co/O1RsjJTHhM pic.twitter.com/oYYMJEFgp1
— BCCI (@BCCI) October 19, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.