AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

राष्ट्रगीतादरम्यान मोहम्मद सिराजला अश्रू अनावर

AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
मोहम्मद सिराज भावूक
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 8:59 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया  (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला आहे. वारंवार येणाऱ्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. दरम्यान सामन्याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  भावूक झालेला दिसला. (aus vs ind 3rd test mohammed siraj in tears during the national anthem Flag of india)

कोणत्याही सामन्याची सुरुवात संबंधित दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने होते. राष्ट्रगीतादरम्यान खेळाडूंचा उर भरुन येतो. अशा वेळेस प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटतो. राष्ट्रगीतावेळेस  मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले. सिराज भावूक झालेला दिसून आला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी या व्हिडीओला भावनिक दाद दिली आहे.

राष्ट्रगीतादरम्यान सिराजला अश्रू अनावर

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून झाली. मात्र त्याआधी टीम इंडिया काही दिवस ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होती. या दरम्यान मोहम्मद सिराजच्या वडिलांचे हैदराबादमध्ये निधन झाले. क्वारंटाईन असल्याने सिराजला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते. वडिलांच्या आठवणीत सिराज भावूक झाला असावा, असंही क्रिकेट चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.

दरम्यान या तिसऱ्या कसोटीत सिराजने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केलं. या वॉर्नरला सिराजने चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं.

दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला आहे. खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा 21-1 असा स्कोअर होता. ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 21 धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन 2* तर विल पुकोव्सकी 14* धावांवर नाबाद आहेत.

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं होतं. मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं होतं. सिराज हा टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 298 वा खेळाडू आहे. या सामन्यात त्याने एकूण 5 विकेट क्रिकेट्स घेतल्या. त्याच्या या पदार्पणातील कामगिरीसाठी त्याचे क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकही करण्यात आले होत.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test : सिडनीवर इतिहास रचण्यास अजिंक्य रहाणे सज्ज, भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने

Australia vs India, 3rd Test, 1st Day :पावसाच्या व्यत्ययामुळे पुन्हा खेळ थांबला

(aus vs ind 3rd test mohammed siraj in tears during the national anthem Flag of india)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.